जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात खा.सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस साजरा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

दरवर्षी खा.सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहर व तालुक्यात विविध ठिकाणी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.या उपक्रमात विशेषकरून महिलांना केंद्रस्थानी ठेवून महिलांसाठी आरोग्य शिबीर, विविध क्षेत्रातील नामवंत महिलांचे व्याख्यान तसेच रांगोळी,पाक कला अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात.मात्र मागील वर्षापासून वैश्विक कोरोना महामारीमुळे सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी शासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी कोरोनाचे संकट अजून संपलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून खा. सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा,नगरसेविका प्रतिभा शिलेदार,माधवी वाकचौरे,मायादेवी खरे,रश्मी कडू,वैशाली भगत,गौरी पहाडे,शीतल लोंढे,कोमल राठी,धनश्री देवरे,कीर्ती पोरवाल,सुवर्णा टेके,योगिता साळी आदी मान्यवर उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close