जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव मतदारसंघात सर्वाधिक 90.96 टक्के मतदान घोयगावात,तर सर्वात कमी मतदान कोपरगावात

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण 2 लाख 64 हजार 832 मतदारांपैकी 2 लाख 01 हजार 874 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बाजुला असून हि टक्केवारी 76.23 इतकी आली असून विधानसभा निवडणुकीत हा विक्रमच मानला जात आहे.सर्वाधिक मतदान घोयगाव ग्रामपंचायत हद्दीत झाले असून ते 90.96 टक्के आहे.तर त्या खालोखाल मोर्विस गावात 90.27 तर त्या खालोखाल हंडेवाडी ग्रामपंचायत हद्दीत 89.51 टक्के उत्साहवर्धक मतदान संपन्न झाले असले तरी सर्वाधिक कमी मतदान हे कोपरगाव शहरातील मतदान केंद्र क्रमांक 100 वर नोंदवले गेले असून ते केवळ 54.44 टक्के इतके कमी असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.मतदान टक्केवारी एकत्रित करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती ती आज पहाटे 2 वाजून 20 मिनीटापर्यंत सुरु होती.

दुपारच्या सत्रात पुणतांबा व वाकडी गटात सत्ताधारी गटाच्या लोणी स्थित एका वरिष्ठ नेत्याने राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांना आपल्या कार्यकर्त्यांमार्फत मदत केल्याचे विश्वसानिय वृत्त प्राप्त झाले आहे.तर पोहेगाव गटात व अन्य बऱ्याच ठिकाणी शिवसेनेच्या अनेकांनी अपक्ष उमेदवार विजय वहाडणे याना मदत केल्याचे उघड होत आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली असून या निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या वतीने आ. स्नेहलता कोल्हे,राष्ट्रवादीच्या वतीने आशुतोष काळे,तर अपक्ष म्हणून कोपरगाव नगरपालिकेचे अध्यक्ष विजय वहाडणे व गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे व वंचित आघाडीच्या वतीने अशोक गायकवाड आदींसह चौदा जणांनी आपले नशीब आजमावले आहे. या निवडणुकीत मतदारांना आपल्या खेचण्यासाठी सर्वच पक्ष व गटातटांनी खूपच जोर लावला होता त्यासाठी प्रस्थापितांनी नेहमी प्रमाणे पाचशे रुपयांचा दर पडद्याआड जाहीर करून त्याची अंमलबजावणी केली असली तरी गाव व गल्ली निहाय हजार,पाच हजारी, दस हजारी,पन्नास हजारी,लक्ष हजारी मनसबदारांना त्यांच्या लायकीप्रमाणे शिदोरी घरपोच करण्यात आली होती.शिवाय नवरात्र व गणोशोत्सत्व आदी काळात ज्या कार्यकर्त्यांनी या नेत्यांचे जोडे उचलले व पायपुसले त्यांच्यासाठी तीन ते पाच हजारांची वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. रंगीत-संगीत पार्ट्यांची मांदियाळी गत महिनाभर सुरु होती ती वेगळीच.त्यामुळे हि निवडणूक तशी अतीतटीची ठरली असली तरी आता या उमेद्वारांचं भविष्य यंत्रात बंदिस्त झाले आहे.तरी 24 ताखे पर्यंत कोण निवडून येणार याच्या चर्चा चौका-चौकात सुरु राहणार आहे.तथापि दुपारच्या सत्रात पुणतांबा व वाकडी गटात सत्ताधारी गटाच्या लोणी स्थित एका वरिष्ठ नेत्याने राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांना आपल्या कार्यकर्त्यांमार्फत मदत केल्याचे विश्वसानिय वृत्त प्राप्त झाले आहे.तर पोहेगाव गटात व अन्य बऱ्याच ठिकाणी शिवसेनेच्या अनेकांनी अपक्ष उमेदवार विजय वहाडणे याना मदत केल्याचे उघड होत आहे. त्यामुळे या निकालाबाबत मतदारांत खूपच औत्सुक्य वाढले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close