खेळजगत
चि. ईशान वर्पे शोतोकॉन कराटे स्पर्धेत तृतीय
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव येथील रहिवाशी व समता इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी चि. ईशान समीर वर्पे (वय-6) हा महाराष्ट्र ट्रॅडिशनल शोतोकॉन कराटे असोसिएशन या संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र ट्रॅडिशनल शोतोकॉन कराटे असोसिएशन या संस्थेच्या वतीने अध्यक्ष प्रा.सुदर्शन पांढरे यांनी नुकत्याच राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा हॅपी थॉट गरीमानगरी येथे आयोजित केल्या होत्या. सदर परीक्षेत अहमदनगर,औरंगाबाद.नाशिक आदी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.त्यात ब्लॅक बेल्ट परीक्षेत चि. ईशान वर्पे याने हे यश संपादन केले आहे.त्याच्या या यशाचे माजी आ. अशोक काळे,कर्मवीर काळे कारखान्यांचे अध्यक्ष आशुतोष काळे,समता पतसंस्थेचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, प्रा.सुदर्शन पांढरे आदीनी अभिनंदन केले आहे.