जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोल्हे गटाचे डोके ठिकाणावर आहे का?-नगराध्यक्ष वहाडणे यांचा सवाल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व तालुक्याचे आमदार पद ताब्यातून गेल्याचे दुःख अजूनही विसरू न शकलेल्या कोल्हे गटाने आज तर निचपणाचा कळसच गाठला असून शहरातील महत्त्वाचे रस्ते व विकासकामे होऊ नयेत म्हणून वारंवार अडथळे आणणाऱ्या कोल्हे गटाच्या उपनगराध्यक्षाने संजीवनीचे दुत सोबत घेऊन कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये जाऊन” मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे लेखी पत्र दिले असून हा निचपणाचा कळस असल्याची प्रतिक्रिया कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतीच एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

“जिल्हाधिकाऱ्यांच्या २८ कामे सुरु करण्याच्या आदेशानंतर कोल्हे समर्थक नगरसेवकांना,”तुमच्या प्रभागातील विकासकामे करायचीत कि नाही,हे लेखी कळवा” असे पत्र आपण सर्वच नगरसेवकांना दि.५ एप्रिल रोजी दिले.पण आपले पाय ओढण्याच्या नादात कोल्हे गटाच्या अपवाद वगळता कुणीही “आमच्या प्रभागातील कामे सुरू करा” असे पत्र आजपर्यंत दिलेले नाही हे विशेष!-विजय वाहाडणे,नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीतील रस्ते जाऊन त्याचे श्रेय आ.काळे व नगराध्यक्ष वहाडणे गटास मिळू नये म्हणून जंगजंग पछाडणाऱ्या कोल्हे गटाचे आणखी प्रताप समोर आले असून त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहून १४४ कलम भंग केला म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी नुकतीच केली आहे.त्यावर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी हि तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,कोल्हे गटाने केवळ सत्ता नाही म्हणून साडेचार वर्षे किळसवाणे डावपेच केले.मान्सूनपूर्व कामे करायला परवानगी असल्याने नगराध्यक्ष म्हणून आपण व तालुक्याचे आ.काळे यांना व स्थानिक नगरसेवकांना कार्यक्रमाला बोलावले.अधिकाऱ्यांनाही बोलावले.निमंत्रण पत्रिका नाही,भाषणे नाहीत.त्याठिकाणी काही स्थानिक रहिवाशीही आले.कोल्हे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्याविरुद्ध तक्रार करावी.विकासकामे करतांना मुख्याधिकारी मला सहकार्य करतात म्हणून त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी असा पोरकटपणा सुरू आहे.मागील महिन्यात संजीवनी कोविड सेंटरच्या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना बोलावून प्रचंड गर्दि जमवून स्वतःचा उदोउदो करून घेणाऱ्या कोल्हे टोळीविरुद्ध १४४ कलम भंगाचा गुन्हा का दाखल होत नाही? सार्वजनिक हिताचे उपक्रम करतांना तरी कुणीही राजकारण करू नये.

नगर जिल्हाधिकारी यांनी २८ विकासकामे मार्गी लावण्यासाठी हिरवा कंदील दिल्यानंतर आपण कोल्हे गटाच्या नगरसेवकांना पत्र दिले कि,आता २८ कामांचा निर्णय झालेला आहे.आतातरी तुमच्या प्रभागातील विकासकामे करायचीत कि नाही,हे लेखी कळवा असे पत्र मी सर्वच नगरसेवकांना दि.५ एप्रिल रोजी दिले.पण आपले पाय ओढण्याच्या नादात कोल्हे गटाच्या अपवाद वगळता कुणीही “आमच्या प्रभागातील कामे सुरू करा” असे पत्र आजपर्यंत दिलेले नाही.राष्ट्रवादी,शिवसेना व अपक्ष नगरसेवकांनी ही कामे सुरू करा असे लेखी कळविले.पण कोल्हे गटाचे अनेक नगरसेवक मला येऊन भेटून सांगतात कि, कोल्हे यांच्या आदेशाशिवाय आम्ही असे पत्र देऊ शकत नाही.मंजूर झालेली कामेही होऊ द्यायची नाहीत,त्यामुळे प्रभागातील नागरिकांना असे वाटते कि नगराध्यक्षच कामे होऊ देत नाहीत.कोल्हे गटाचे व इतरही सर्व नगरसेवक,शहरातील काही पक्ष व संघटना कार्यक्षम मुख्याधिकारी सरोदे यांची बदली होऊ देऊ नका मला भेटून सांगतात.पण कोल्हे यांच्या आदेशावरून काहीजण त्याच अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी करतात.सत्ता नाही म्हणून तडफडणाऱ्या कोल्हे गटाने पोरकटपणा बंद करावा. स्वतःच्याच प्रभागातील विकासकामे करायला विरोध करण्याचा मूर्खपणा केल्याचा विक्रम महाराष्ट्रात “कोल्हे” यांच्याच नावावर नोंदवला जाणार आहे. विक्रमवीर-विक्रमादित्य कोल्हे यांचे जाहिर अभिनंदन.या विक्रमाबद्दल त्यांचा सत्कार डॉ.आंबेडकर मैदानावर करायचा आहे, पण गर्दि जमविली तर माझ्यावरही गुन्हा दाखल होईल म्हणून कोरोना पुर्णपणे गेल्यानंतरच असा सत्कार करता येईल अशी खोचक टिपणीही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close