कोपरगाव तालुका
काळे यांची प्रहारच्या कार्याध्यक्ष पदी निवड
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
प्रहार जनशक्ती पक्षाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर उत्तरचे जिल्हा कार्यध्यक्ष संजय गोविंदराव शिंदे यांच्या हस्ते माहेगाव देशमुख येथील संदीप चांगदेव काळे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या कोपरगाव तालुका कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली व कोपरगाव शहर सचिव पदी मयूर रमेश धोंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या वेळी तालुका संघटक नितीन तीपायले, प्रहारचे कोपरगाव तालुकाअध्यक्ष संदीप क्षीरसागर व शहर प्रमुख दीपक पठारे,प्रहार सेवक विशाल ठोंबरे,महेश चव्हाण,कलीम शेख,संदीप भाटे,प्रवीण मेतरे,गणेश खंदारे,कृष्णा भिंगारे,अमोल घोन्गटे,आदि मान्यवर उपस्थित होते.
पक्षाचे सर्व नियम धोरणे या नुसार प्रहार पक्षाच्या वाढी करता तसेच देशसेवा,लोकसेवा,अपंग सेवा या करिता सदैव कार्यरत राहून वरीष्टाच्या आदेशानुसार पक्ष्याच्या सर्व कार्यक्रमात व आंदोलन सहभागी राहणार असून अनाथ व वयोवृद्ध यांच्या सेवे बरोबर भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलंनात सहभाग घेऊन सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळून देणार असल्याचे नूतन प्रहारचे कोपरगाव तालुका कार्याध्यक्ष व शहर सचिव यांनी त्यावेळी सांगितले आहे.सर्व नुतन पदाधिकारी यांना पुढील वाटचालीस जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे,अहमदनगर उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे यानी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.