जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पढेगावात हद्दपार आरोपीस केली पोलिसांनी अटक,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पढेगाव येथे नगर जिल्ह्यातून हद्दपार केलेला आरोपी आलेला असल्याची खबर पोलिसांना मिळाल्यावरुन पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपी राहुल कैलास कदम (वय-24) यास पोलिसांनी काल दुपारी चारच्या सुमारास अटक केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव तालुक्यातील उपद्रवी व सामाजिक शांतता भंग करणाऱ्या अनेक आरोपींना शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी 23 सप्टेंबर रोजी हद्दपार केले आहे.त्यात राहुल कदम याचाही समावेश आहे.त्यास नगर जिल्हा व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर,येवला, निफाड तालुक्यातून हद्दपार केलेले आहे.मात्र तो पोलिसांची नजर चुकवून आपल्या गावात गुपचूप राहतो अशी खबर कोपरगाव तालुका पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत लागली होती.त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कारवाईसाठी पाठवले असता तेथे सदरचा आरोपी आढळून आला.त्याच्या विरुद्ध पोलीस नाईक जहिर निजाम शेख यांनी गुन्हा र,नं.46/2019 ,महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 1951 चे कलम 142 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्री पवार हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close