कोपरगाव तालुका
कोपरगावची रस्ते, पाण्यामुळे दुरावस्था व बदनामी-आशुतोष काळे यांची खंत
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव शहर व तालुक्यातील गाव व शहराची पाणी व रस्त्यामूळे अत्यंत दुरावस्था झाली असून परिणाम स्वरूप कोपरगाव शहरातील छोटे-मोठे व्यवसाय धोक्यात आले आहे हे चित्र बदलण्यासाठी २१ ऑक्टोबरला आपल्याला भरघोस मतांनी निवडून द्या, विकास करून दाखवतो असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी एका प्रकार सभेत बोलताना केले आहे.
कोपरगाव शहराचा अतिशय जिव्हाळयाचा असलेला पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता नसतांना देखील मागील पाच वर्षापासून सातत्याने प्रयत्न केले आहे. माजी आमदार अशोक काळे यांनी ४ नंबर साठवण तलावाच्या विस्तारीकरणासाठी आणलेला निधी परत जावू नये यासाठी वारंवार आंदोलने करून शासनस्तरावर पाठपुरावा केला आहे. कोपरगाव शहराच्या विकासासाठी मी आजपर्यंत सर्वोतोपरी सहकार्य केलेले आहे- आशुतोष काळे
कोपरगाव विधानसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात पोहचली असून राष्ट्रवादीची प्रचारसभा शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये नुकतीच आयोजित केली होतंय त्यावेळी कॉर्नर सभेत आशुतोष काळे बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेविका प्रतिभाताई शिलेदार, नगरसेवक मंदार पहाडे आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, कोपरगाव शहराचा अतिशय जिव्हाळयाचा असलेला पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता नसतांना देखील मागील पाच वर्षापासून सातत्याने प्रयत्न केले आहे. माजी आमदार अशोक काळे यांनी ४ नंबर साठवण तलावाच्या विस्तारीकरणासाठी आणलेला निधी परत जावू नये यासाठी वारंवार आंदोलने करून शासनस्तरावर पाठपुरावा केला आहे. कोपरगाव शहराच्या विकासासाठी मी आजपर्यंत सर्वोतोपरी सहकार्य केलेले आहे.
४ व ५ नंबर साठवण तलावाचे काम कोपरगाव नगरपरिषदेने तातडीने सुरु करावे यासाठी प्रमाणिक प्रयत्न करून मागील पाच वर्षापासून आजपर्यंत जेवढे जिल्हाधिकारी आले त्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना समक्ष भेटून निवेदन देवून साठवण तलावाचे काम सुरु करण्यासाठी प्रयत्न केले असून ९ दिवस धरणे आंदोलन सुद्धा केले याचे कोपरगाव शहराचे नागरिक साक्षीदार आहेत. आपल्या शेजारील शहरांप्रमाणे आपल्याही कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सेवा करण्याची संधी द्या कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलवून दाखविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी उपस्थितांना शेवटी दिला आहे.