कोपरगाव तालुका
मुख्याध्यापक सांगळे रयतमधून सेवानिवृत्त
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सोनारी गावाचे रहिवाशी असलेले व रयत शिक्षण संस्थेच्या शिवशंकर विद्यामंदिर रवंदे येथे मुख्याध्यापक या पदावर रुजू असलेले बाबासाहेब कारभारी सांगळे हे आपल्या ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले आहे.
संवत्सर येथील विद्यालयाला आदर्श विद्यालय म्हणून ‘कर्मवीर परितोषिकाने’ सन्मान. संस्थेतील पाहिले पारितोषिक घेण्याचा पहिला मान मिळविला होता.२०१६ मध्ये शिवशंकर विद्यालय “आदर्श विद्यालय कर्मवीर पारितोषिक” प्रदान,शिवशंकर विद्यालयात कार्यरत असताना सलग तीन वेळा “उपक्रमशील मुख्याध्यापक” पुरस्काराने सन्मानित,शिवशंकर विद्यामंदिर ‘आदर्श विद्यालय’ ‘कर्मवीर पारितोषिकाने’ दोन वेळा सन्मानित,२०१८ मध्ये गणिततज्ज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
एक उत्कृष्ट प्रशासक,आदर्श शिक्षक,मुख्याध्यापक,विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. आपल्या एकूण सेवा कालावधीत त्यांनी करंजी, खडकी,गोधेगाव,संवत्सर,कुंभारी,रवंदे अशा विविध ठिकाणी असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयात अध्यापन आणि मुख्याध्यापक म्हणून काम केले त्यांच्या एकूण कार्याचा थोडक्यात आढावा असा करंजी येथील हायस्कूल मधून १ सप्टेंबर १९८९ रोजी अध्यापन कार्यास सुरुवात केली होती.
त्यांना २०१८ मध्ये रामानुजन पुरस्काराने सन्मानित केले होते,याखेरीज सलाम बॉम्बे फाउंडेशन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या अभियानात शिवशंकर विद्यामंदिर हे अहमदनगर जिल्ह्यातील पहिली तंबाखू मुक्त शाळा म्हणून घोषित केली होती.
याच बरोबर विद्यालयात ‘माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन’, ‘स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्राम स्वच्छता अभियानाचे आयोजन’, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन,स्त्री जन्माचे स्वागत हा उपक्रम, प्रत्येक घरावर घरातील मुलीच्या नावाची पाटी लावणे हा उपक्रम तसेच किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन असे विविध उपक्रम राबवून त्यांनी आणि आपल्या एकूण सेवा कालावधी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.वकील, डॉक्टर,शिक्षक,इंजिनीयर,पत्रकारीता अशा अनेक क्षेत्रात त्यांचे विद्यार्थी आज कार्यरत आहेत.