कोपरगाव तालुका
डॉ .कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
कोपरगाव (प्रतिनिधी)
महाविधालय येथे डॉ .कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३२ वी जयंती मोठ्या
उत्साहात साजरी करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
बाबासाहेब खिलारी हे होते.
कर्मवीर भाऊराव पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक होते त्यांनी विसाव्या शतकाच्या प्रारंभी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जनसामान्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. त्यांच्या या कार्याचा वेलू आज गगणावर गेला असून या संस्थेच्या आशिया खंडात सर्वाधिक शिक्षण संस्था आहेत.त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे या साठी त्यांनी नुकतीच गोधेगाव येथे 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून श्री सद्गुरू गंगागिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ
थोपटे होते. यावेळी माधवराव रांधवणे अध्यक्ष स्थानिक समिती ,प्रकाश
शिंदे ,जे के शिंदेसर ,मछिंद्र खैरनार ,भाऊसाहेब शिरसाठ आदि समितीवरील
पदाधिकारी यावेळी हजर होते. कार्यकमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य
गोविंद बी आर .यांनी केले .कु भाटे साक्षी ,कु भुजाडे वैष्णवी यांनी
कर्मवीराचा जीवनपट सांगितलातर प्रा . रांधवणे व्ही सी यांनीहि आपले मनोगत
व्यक्त केले .
कार्यक्रमासाठी एम व्ही दाभाडे,जी एंन.मुठे ,जी एन खंदारे, रांधवणे ,शिंदे, करडे, गभाले ,गवळीसर ,गोरे सुरेश
,श्रीमती गायकवाड के एम आदींनी परिश्रम घेतले यावेळी सर्व स्कूल कमेटी
सदश्य ग्रामस्थ विधार्थी मोठ्या संख्येनं हजर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन खंदारे एस एस .व्ही पी वाघमारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पी एस कुंदेसर यांनी मानले.