जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

खरी लायकी समजण्यासाठी नामनिर्देशन भरून मतदारसंघाबाहेर चला-वहाडणेंचे सत्ताधाऱ्यांना खुले आव्हान

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सत्ताधारी गटाने खऱ्या अर्थाने साडेतीनशे कोटींची कामे मतदारसंघात केली असतील तर त्यांनी मतदारांकडे मते मागण्याची जरुरीच नाही त्यांनी आपले नामनिर्देशन भरून खुशाल मतदारसंघाचे बाहेर निघून जावे आपणही आपली मतदारांत खरी किंमत किती आहे हे पाहण्यासाठी आतुर आहोत सत्ताधाऱ्यानी हे जाहीर आव्हान स्वीकारावे असे खुले आव्हान कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आ. स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.त्यामुळे तालुक्यात औत्सुक्य निर्माण झाले आहे.

राज्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आगामी महिन्यात 21 ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या निवडणूक संपन्न होत आहेत.या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष व त्यांचे नेते यांच्यात मतदारसंघातील कामावरून स्रेयवादाची लढाई जुंपली आहे.दावे-प्रतिदावे केले जाऊ लागले आहेत.कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आ. स्नेहलता कोल्हे यांनी साडे तीनशे कोटींची विकास कामे केल्याचा दावा केला असून तशी प्रकाशने प्रसिद्ध केली आहेत.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वाहाडणे यांनी हे खुले आव्हान दिल्याचे मानले जात आहे.

राज्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आगामी महिन्यात 21 ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या निवडणूक संपन्न होत आहेत.या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष व त्यांचे नेते यांच्यात मतदारसंघातील कामावरून स्रेयवादाची लढाई जुंपली आहे.दावे-प्रतिदावे केले जाऊ लागले आहेत.कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आ. स्नेहलता कोल्हे यांनी साडे तीनशे कोटींची विकास कामे केल्याचा दावा केला असून तशी प्रकाशने प्रसिद्ध केली आहेत.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वाहाडणे यांनी हे खुले आव्हान दिल्याचे मानले जात आहे.

त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे कि,येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वच मतदारसंघात अनेक राजकीय पक्ष, अपक्ष,महायुती,महाआघाडी असे अनेक उमेदवार बाशिंग बांधून तयार आहेत.सर्वच उमेदवारांचा दावा आहे कि, जनतेची फारच सेवा केली,कोटयावधी रुपयांचा निधी आणून विकासकामे मोठ्या प्रमाणावर केली,आपणच पुन्हा आमदार होणार,आपणच तालुक्याचे कार्यसम्राट, आपणच सर्वात जास्त लोकप्रिय व आपणच जास्त नारळ फोडले,जाहिरात फलक लावले,भूमिपूजने-उदघाटने केली.

आपली पात्रता,”लायकी”,आपले कार्य,आपले घराणे,कर्तृत्व, चरित्र, चारित्र्य सर्वच मतदारांनी चांगलेच माहित असल्याने आपणांस प्रचाराची,सभा घेण्याची,काहीही वाटप करण्याची, घसा ताणण्याची,आरोप-प्रत्यारोप करण्याची, हिशोब ठेवण्याची,बंडल मारण्याची व बंडल वाटण्याची काहीच आवश्यकता नाही.मतदानाच्या दिवशी आपण कोपरगाव मतदारसंघात येऊ.

या विकासाचा दावा करणाऱ्या व विकास करण्यासाठी तळमळणाऱ्या सर्वच तथाकथित जनसेवकांना आपण आवाहन करतो कि, आपण सर्वांनीच जनतेची-समाजाची अतिसेवा केलेली आहे,विकासकामाचे अहवालही प्रसिद्ध केले आहेत,आपल्या घराण्यांना मतदारसंघच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो.म्हणून आपण सर्वजण उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एकाच बसने कुठेतरी लांब देवदर्शनासाठी किंवा पर्यटनाला जाऊ.गाडीही वातानुकूलितच घेऊ कारण आपण सर्वजण समाजाची सेवा करून फारच थकलेलो दमलेले आहोत.आपली पात्रता,”लायकी”,आपले कार्य,आपले घराणे,कर्तृत्व, चरित्र, चारित्र्य सर्वच मतदारांनी चांगलेच माहित असल्याने आपणांस प्रचाराची,सभा घेण्याची,काहीही वाटप करण्याची, घसा ताणण्याची,आरोप-प्रत्यारोप करण्याची, हिशोब ठेवण्याची,बंडल मारण्याची व बंडल वाटण्याची काहीच आवश्यकता नाही.मतदानाच्या दिवशी आपण कोपरगाव मतदारसंघात येऊ.आपण निवडणुकीत खर्च करणार होतो.तो आपल्या घामाचा-कष्टाचा पैसा मुख्यमंत्री निधीला पाठवून देऊ.व समाजातील आपली खरी किंमत आजमावून पाहू असे आवाहन केले असून आता आ. कोल्हे हे आव्हान कसे पेलतात या कडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close