जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

वर्तमान महिला आता जगाचे नेतृत्व करण्यास सक्षम-गौरव

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

‘नारी अबला होती.शिक्षण विचाराने ती आता सबला झाली असून पाळण्याची दोरी सांभाळण्याबरोबरच कुटुंबासोबतच आता जगाचे नेतृत्व करत आसल्याचे प्रतिपादन कोपरगाव येथील ब्रम्हकुमारी सरला दीदी यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या जागतिक महिला दिन आणि महाशिवरात्री निमित्त एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

‘‘प्रत्येक व्यक्तीच्या विचारांवर सुख,दु:ख अवलंबुन असते.प्रत्येक नात्यात सुख असले पाहिजे,अहंकार नसला पाहिजे.विचारांतूनच उर्जा बनते आणि ती उर्जा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातून दिसून येते हे सर्व शिवाच्या शक्तीपासून तयार होते”-सरला दीदी,कोपरगाव.

कोपरगाव शहरातील निवारा परिसरातील वीरशैव महिला मंडळ आणि श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्या वेळी त्या बोलत होत्या.

सदर प्रसंगी वीरशैव महिला मंडळाच्या संस्थापिका सुहासिनी कोयटे,समता इंटरनॅशनल स्कूलच्या विश्वस्त स्वाती कोयटे,श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पलता सुतार तसेच निवारा,परिसरातील महिला,वीरशैव महिला मंडळ,श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

त्या वेळी पुढे बोलताना म्हणाल्या कि,’‘प्रत्येक व्यक्तीच्या विचारांवर सुख,दु:ख अवलंबुन असते.प्रत्येक नात्यात सुख असले पाहिजे,अहंकार नसला पाहिजे. विचारांतूनच उर्जा बनते आणि ती उर्जा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातून दिसून येते हे सर्व शिवाच्या शक्तीपासून तयार होते.शिवाची शक्ती म्हणजे आत्मा होय.आत्म्यापासूनच विचार तयार होत असतात सर्व विचार हे व्यक्तीच्या वागण्या बोलण्यावर अवलंबून असते.’

व्याख्यानपर कार्यक्रमाची शुभारंभ वीरशैव महिला मंडळाच्या संस्थापिका सुहासिनी कोयटे,यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

प्रमुख व्याख्यातांचा परिचय आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरशैव महिला मंडळ अध्यक्षा दिपाली नलगे यांनी केले.या वेळी मान्यवर व्याख्यात्यांचा सत्कार करण्यात आला तसेच समता इंटरनॅशनल स्कूलच्या विश्वस्त स्वाती कोयटे यांनीही महिला सशक्तीकरण या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वीरशैव महिला मंडळाच्या प्रिती साखरे,अर्चना नीलकंठ यांनी केले आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष विष्णुपंत गायकवाड,नंदिनी कदम तसेच वीरशैव महिला मंडळ आणि श्रेष्ठ नागरिक मित्रमंडळाच्या महिलांनी विशेष परिश्रम घेतले आहे.उपस्थितांचे आभार वीरशैव महिला मंडळाच्या अध्यक्षा दिपाली नलगे यांनी मानले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close