कोपरगाव तालुका
पोलीस प्रशिक्षणातून ग्रामीण भागातील मुलींना चांगली संधी-आवाहन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगांव-(प्रतिनिधी)
पोलीस आणि आर्मी विभागात मुलींना चांगली संधी असल्याने या संधीचा त्यांनी लाभ घेवून स्वत:च्या पायावर उभे राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी कोपरगांव येथील महिला महाविद्यालयात आयोजित विद्यार्थीनींच्या निरोप समारंभ कार्यक्रमात केले आहे.
ग्रामीण भागातील मुलींनी आपल्या पालकांचे नांव उज्ज्वल करावे यासाठी भविष्यात मुलींसाठी विविध उपक्रम राबविण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न राहील-राजेश परजणे-अध्यक्ष,गोदावरी दूध संघ.
कोपरगांव येथील प्रिशदर्शनी ग्रामीण महिला मंडळ संचलित बी.एस्सी ( होमसायन्स ) आणि बी.सी.ए. महिला महाविद्यालयामध्ये प्रवरा पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आलेले असून पहिल्या तीन महिन्याच्या कालावधीतील प्रशिक्षणार्थी विद्यार्थीनींना निरोप देण्यासाठी महाविद्यालयात निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी ते बोलत होते. या प्रशिक्षण कालावधीत पोलीस,आर्मी या विभागांसह मैदानी सराव,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,रायफल शुटींग,हॉर्स रायडींग अशा विविध विषयांवर तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना राजेश परजणे यांनी महिला महाविद्यालयातून शिक्षण घेवून बाहेर पडलेल्या अनेक विद्यार्थीनी आज विविध क्षेत्रात स्वत:च्या पायावर उभ्या आहेत.महाविद्यालयातून मिळणाऱ्या शिक्षणाचा लाभ घेवून अनेक विद्यार्थींनी आज शासकीय सेवेत कार्यरत असल्याचे सांगून मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा आणि ग्रामीण भागातील मुलींनी आपल्या पालकांचे नांव उज्ज्वल करावे यासाठी भविष्यात मुलींसाठी विविध उपक्रम राबविण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न राहील असे सांगितले.यावेळी कु.वैभवी दणके या विद्यार्थीनीने प्रशिक्षण कालावधीतील अनुभव कथन करुन या प्रशिक्षणाचा आम्हाला नक्कीच चांगला लाभ होईल अशी भावना व्यक्त केली आहे.
माजी मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,महाविद्यालयाचे कार्यकारी अधिकारी राजेश परजणे,खासदार डॉ.सुजय विखे,मुख्य कार्यकारी अधिकारी सुस्मिता विखे पाटील,संस्थेचे सचिव डॉ.हरिभाऊ आहेर,डॉ.राम पवार,प्रशासकीय अधिकारी सुनीता कदम,प्रभारी प्राचार्य साईप्रसाद खड्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण केंद्र सुरु असून त्याचा मुलींना चांगला लाभ झालेला आहे.