कोपरगाव तालुका
कोपरगावात ना.थोरात यांचा वाढदिवस साजरा
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवसा निमित्त महिलांना शिलाई मशिनचे वाटप करून साजरा करण्यात आला याचा मला खुप आनंद झाला असे प्रतिपादन अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शरयु रणजीत देशमुख यांनी केले आहे.
कोपरगाव येथे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला त्या वेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे हे होते.
सदर प्रसंगी निवारा महिला मंडळाच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे,राजेंद्र वाघमारे जिल्हा अध्यक्ष अहमदनगर कॉंग्रेस कमिटी (अ.जा.विभाग),सुभाष तोरणे पक्ष निरीक्षक कोपरगाव नगरपरिषद,कार्लस साठे जिल्हा उपाध्यक्ष अहमदनगर कॉंग्रेस कमिटी (अ.जा.विभाग),यादव त्रिभुवन जिल्हा कार्याध्यक्ष (अ.जा.विभाग),सविता विधाते कोपरगाव तालुका अध्यक्ष (अ.जा.विभाग),जयश्री राक्षे कोपरगाव शहर अध्यक्ष,मंगल आव्हाड कोपरगाव तालुका कार्याध्याक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.
देशमुख पुढे म्हणाल्या की,”महिलांनी प्रत्यक्ष कामाला सुरवात करा,लोक काय म्हणतील हा विचार मनातुन काढुन टाका.मार्केटमध्ये उतरून अनुभव घेतल्याशिवाय कोणतचा व्यवसाय फुलत नाही असेही त्या शेवटी म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सविता विधाते म्हणाल्या की, महिलांच्या हाताला काम मिळाल्या शिवाय मिळाल्या शिवाय महिलांचा विकास होणार नाही. त्यामुळे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसा निमित्त महिलाना शिलाई मशिनचे वाटप करून आर्थिक पाठबळ देण्याचा हा छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत. भविष्यात जास्तीत जास्त महिलांना यामध्ये सामावुन घेण्याचा आमचा प्रयत्न चालु असल्याचे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलतांना कोयटे म्हणाले की, व्यवसाय कोणताही करा, परंतु त्या वस्तुचे ब्रँडींग आणि मार्केटींग आपल्याला करता आले पाहीजे असा सल्ला त्यांनी दिला. तुम्ही काहीही बनवा त्याचे ब्रँडींग आणि मार्केटींग करून तुम्हाला आर्थिक सक्षम करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.दरम्यान राजेंद्र वाघमारे, सुभाष तोरणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी शहर सचिव राजेंद्र घोडेराव, शहर कार्याध्यक्ष युसुफ शेख,नितीन शिंगाडे,ज्योती आयनेार,हिराबाई शिंदे, मुक्ताबाई कुदळे,सिंधुबाई खंडीझोड,आशा पवार,मनिषा गांगुर्डे यांचेसह अनेक महिला कार्यकर्ते उनस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय आव्हाड यांनी केले, तर शहराध्यक्ष रविंद्र साबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.