कोपरगाव तालुका
गवळी यांचा आ.काळे यांच्या हस्ते सत्कार संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक रमेश पांडुरंग गवळी यांना नुकताच उंबरे येथील छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा छत्रपती पुरस्कार देवून गौरविण्यात आले त्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी नुकताच त्यांचा सत्कार केला आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होता आहे.
गवळी यांनी वैश्विक कोरोना संकटात नागरिकांना मास्क,सॅनिटायझर व अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करून गरीब गरजू नागरिकांना किरणा साहित्य देऊन मदतीचा हात दिला.त्यांनी स्थापन केलेल्या संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी नेहमी आर्थिक मदत करीत असतात.कोरोना संकटात दिवाळीच्या सणाच्या वेळी नागरिकांना मिठाईचे वाटप व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.त्यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन उंबरे येथील छत्रपती प्रतिष्ठानने त्यांना सामाजिक कार्याच्या योगदानाबद्दल ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या हस्ते छत्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.त्याबद्दल आ.काळे यांनी गवळी यांचा सत्कार करून ते करीत असलेल्या समाजिक कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगुले,नगरसेवक मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, फकीर कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.