गुन्हे विषयक
सामायिक विहिरीच्या पाण्यावरून हाणामारी,गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गट क्रमांक ३६२ मधील शेतात असलेल्या सामायिक विहिरीच्या पाणी वाटपाच्या कारणावरून आरोपी नरेंद्र सोपान चुनाळे याने फिर्यादी निवृत्ती गजानन चुनाळे (वय-५२) यांना आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास,”तू पाणी भरायचे नाही”असे म्हणून पाणी भरण्यास हरकत घेतली व फिर्यादिस लाथा बुक्यांनी मारहाण करून सदर भांडण सोडण्यास आलेल्या फिर्यादीची पत्नी व मुलगा गोवर्धन चुनाळे यांनाही शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी निवृत्ती चुनाळे व आरोपी नरेंद्र चुनाळे यांची सामायिक विहीर असून या विहिरीच्या पाण्याचा वापर ते आळीपाळीने करतात.मात्र दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ग.क्रं.३६२ मध्ये असलेल्या सामायिक विहिरीचे पाणी घेण्याच्या कारणावरून आरोपी नरेन्द्र चुनाळे याने फिर्यादिस लाथा बुक्यांनी मारहाण करून खाली पाडून छातीत तसेच उजव्या करंगळीस चावा घेतला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी निवृत्ती चुनाळे व आरोपी नरेंद्र चुनाळे यांची सामायिक विहीर असून या विहिरीच्या पाण्याचा वापर ते आळीपाळीने करतात.मात्र दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ग.क्रं.३६२ मध्ये असलेल्या सामायिक विहिरीचे पाणी घेण्याच्या कारणावरून आरोपी नरेन्द्र चुनाळे याने फिर्यादिस लाथा बुक्यांनी मारहाण करून खाली पाडून छातीत तसेच उजव्या करंगळीस चावा घेतला आहे.या भांडणात फिर्यादीची पत्नी व मुलगा हे भांडण सोडविण्यास आले असता त्यांना सुद्धा शिवीगाळ करून दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी फिर्यादी यांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी निवृत्ती चुनाळे यांनी आरोपी नरेंद्र चुनाळे याचे विरुद्ध गुन्हा क्रं.४४/२०२१ भा.द.वि.कलम ३२४,४४७,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.प्रभाकर काशीद हे करीत आहेत.