जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

नगराध्यक्ष वहाडणे यांनी वेळ वाया घालवू नये-आवाहन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेस पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या येसगाव येथील साठवण तलावातील मासे पकडण्याचा ठेका मागील सत्ताधाऱ्यांनी प्रतिवर्षी ०१ लाख ६ हजार रुपयांना दिला,तोच ठेका विजय वहाडणे यांनी प्रतिवर्षी १४ लाख १४ रुपयांना दिला व ५ वर्षात त्यांनी नगरपरिषदेचे किमान ६० ते ७० लाख रुपये उत्पन्न वाचविले आहे.ते लाखो रुपये कुणी वाटून घेतले असणार हे जनतेला ज्ञात आहे.आज हेच दांभिक लोक नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यावर आरोप करत असल्याने या नाठाळांना वेळ देण्यात आपला वेळ वाया घालवू नये असे आवाहन भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा.सुभाष शिंदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये नुकतेच केले आहे.

नगराध्यक्ष वहाडणे तलावातील माशांच्या ठेक्यात तडजोड केली असती तर ते तुम्ही कर्जमुक्त झाले असते.विजय वहाडणे यांना व्यवहार कळत नाही.त्यामुळे यानंतर तुम्ही सातभाई यांना उत्तर देऊ नका,कारण त्यांचे इतके तुम्ही महान नाही.त्यांच्या नादी लागून त्यांचे अनेक सहकारी बरबाद झाले.काहीजण बँकेचे टेंशन-कोर्ट कचेऱ्यामूळे आजारी पडून गेले आहे-प्रा.सुभाष शिंदे,माजी शहराध्यक्ष भाजप.

आगामी नोव्हेंबर महिन्यांत कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक आली असल्याने आता कोपरगाव शहरात राजकीय आरोप प्रत्यारोपांची धुळवड सुरु झाली असून त्याचा प्रत्यय आता नागरिकांना येत आहे.गत स्थायी समितीच्या बैठकीत सोळा कामांच्या निविदा सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी फेटाळून लावुन भाजपने त्याची सुरुवात केली आहे.त्यामुळे शहरात वातावरण गढूळ बनले आहे.त्या विरोधात राष्ट्रवादीने गत सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून या घटनेचा निषेध केला आहे,शिवाय शहरात सर्वत्र भाजपच्या या कृत्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी घरोघरी पत्रक वाटून जनजागृती केली आहे.त्यामुळे दिवसेंदिवस शहरात राजकीय धुळवड वाढत चालली आहे.या प्राश्वभूमीवर माजी नगराध्यक्ष संजय सातभाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यावर आरोप केल्याने त्याला उत्तर देताना वाहाडणे समर्थक भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा.सुभाष शिंदे यांनी त्यांना उत्तर देताना वहाडणे यांना हे आवाहन केले आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”वहाडणे यांनी या ठेक्यात तडजोड केली असती तर ते तुम्ही कर्जमुक्त झाले असते.विजय वहाडणे यांना व्यवहार कळत नाही.त्यामुळे यानंतर तुम्ही सातभाई यांना उत्तर देऊ नका,कारण त्यांचे इतके तुम्ही महान नाही.त्यांच्या नादी लागून त्यांचे अनेक सहकारी बरबाद झाले.काहीजण बँकेचे टेंशन-कोर्ट कचेऱ्यामूळे आजारी पडून गेले.२४ तास सोबत असणारे आत्महत्या करून गेले.समता पतसंस्था,ज्योती पतसंस्था राज्य पातळीवर नावाजल्या.सातभाई पतसंस्था व बँक मात्र गायब झाल्या.वहाडणे कर्जबाजारी आहेत ते कर्ज नक्की फेडतीलच.
माजी महिला आमदार या २०१४ च्या मोदी लाटेत ३० हजार मतांनी निवडून आल्या होत्या.२०२० च्या निवडणुकीत त्या निसटत्या मतांनी पराभूत झाल्या यात समाधान मानू नका.२०१४ चे ३० हजार मतांचे लीड का कमी झाले ? हे आधी सांगा.काहींची संशयास्पद भूमिका असल्यानेच प्रभाग पाच मध्ये भाजपाला कमी मते मिळून पराभव झाला असावा.
यानंतर वहाडणे यांनी कुणालाही उत्तर देण्यात वेळ घालवू नये.कारण नगराध्यक्ष वहाडणे यांना काही कुटिल शक्ती आरोप प्रत्यारोपात अडकवून ठेवतील.त्यांनी फक्त शहर विकासालाच वेळ द्यावा.बँक-पतसंस्था-नगरपरिषद हातात नसल्याने ते पूर्ण मोकळे आहेत.तुमच्यावर आरोप करणारे व त्यांचे कर्तृत्व,पराक्रम जनतेला माहित आहेत.नगराध्यक्षपद-आमदारपद गेले तसे येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीतही होणार आहे.नगराध्यक्ष वहाडणे यांच्यावर जनतेचा विश्वास आहे आरोप करणारे कुणाचे ताबेदार हे सर्वांना माहित आहे.त्यामुळे आपला वेळ व श्रम वाया घालवू नये हे उत्तम असे आवाहनही प्रा.सुभाष शिंदे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close