गुन्हे विषयक
कोळपेवाडीत एकाचे अकस्मात निधन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीत एक अज्ञात इसमाचा मृत्यू झाला असून नजीकच्या नागरिकांनी त्याला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता उपचार करणाऱ्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.मात्र हा मृतदेह कोणाचा हे अद्याप निश्चित होऊ शकले नाही.
दरम्यान मृत व्यक्ती ही या परिसरात राहणारी,वावरणारी व भीक मागणारी व्यक्ती असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.ही घटना दि.२४ जानेवारी रोजी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास उघड झाली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्युची नोंदणी पुस्तक क्रं.०४/२०२१ सि. आर.पी.सी.१७४ प्रमाणे अकस्मात मृत्यची नोंद केली आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव या च्या मार्गदर्शनाखाली पो.ना.बी.एल.ढाका हे करित आहेत.