जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शहरातील आरक्षणाबाबत गैरसमज पसरू नका-नगराध्यक्ष यांचा इशारा

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव( प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील येवला रोडलगतच्या सर्वे नं.२१० वरील भूखंडाच्या आरक्षणाबाबत सत्ताधारी शंभर टक्के खोटे व गैरसमज पसरविण्याचे काम भाजपचा कोल्हे गट पत्रके वाटून करत असल्याचा आरोप कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस देऊन केला असून त्यांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला आहे.

“ज्यांच्या काळात आरक्षण वगळण्याचे ठराव झाले त्यांचे वारसदार मात्र भंपकसारखे आरोप करताहेत हे दुर्दैवी आहे.पोलीस परेड ग्राऊंड व पोलीस ठाण्याच्या जागेबद्दलही आमच्यावर नाहक टिका सुरू आहे.यांना क्रीडांगण व खेळाडूंची खरेच काळजी असती तर कोपरगावचे क्रीडासंकुल संजीवनीवर पळविले गेले तेंव्हा का मान घालून गप्प बसले ? का विरोध केला नाही ?”-विजय वहाडणे,अध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

आगामी दहा महिन्यांनी कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक आली असल्याने आता कोपरगाव शहरात राजकीय आरोप प्रत्यारोपांची धुळवड सुरु झाली असून त्याचा प्रत्यय आता नागरिकांना येत आहे.गत स्थायी समितीच्या बैठकीत सोळा कामांच्या निविदा सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी फेटाळून लावुन भाजपने त्याची सुरुवात केली आहे.त्यामुळे शहरात वातावरण गढूळ बनले आहे.त्या विरोधात राष्ट्रवादीने गत सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून या घटनेचा निषेध केला आहे,शिवाय शहरात सर्वत्र भाजपच्या या कृत्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी घरोघरी पत्रक वाटून जनजागृती केली आहे.त्यामुळे दिवसेंदिवस शहरात राजकीय धुळवड वाढत चालली आहे.या प्राश्वभूमीवर आज नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सत्ताधाऱ्यांच्या आरोपाला आज सडेतोड उत्तर दिले आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”दि.२३-डिसेंबर १९८५ मध्ये नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सदरच्या जागेवरील आरक्षण वगळण्याचा ठराव झालेला आहे.(ठराव क्र.४) त्यावेळी नगराध्यक्ष होते स्व.वसंतराव सातभाई असल्याचा आरोप करून सत्ताधारी गटावर बाजी उलटवली आहे.व पुढे म्हटले आहे की,”आज त्यांचेच कर्तृत्ववान चिरंजीव संजय सातभाई पत्रकार परिषदेत जास्तच तारे तोडताहेत.ते किती कर्तृत्ववान आहेत हे बँकेच्या ठेवीदारांना चांगलेच माहित आहे.त्याविषयी मी आज काहीच बोलणार नाही”म्हणून आपले काही भात्यातील बाण राखीव ठेवल्याचे दिसत आहे.

त्यानंतर स्व.माधवराव आढाव नगराध्यक्ष असतांना दि.१८ जून १९८९ मध्ये विशेष सर्वसाधारण सभेत ही आरक्षणे वगळण्याचा (ठराव क्र.९) झाला होता.त्यानंतर दि.०३ ऑक्टोबर २००१ ला सर्वसाधारण सभेत स.नं.२०५ व २१० वरील आरक्षणे कमी करावीत असा (ठराव क्र.११अ) झाला होता.त्या नंतर कोपरगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा होत्या कांचनबाई धनालाल काले.त्यानंतर दि.३० ऑक्टोबर २००२ मध्ये अनुक्रम नं.१७ नुसार आरक्षित जमीन खरेदीसाठी खूप मोठी रक्कम लागते व नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने सदरची आरक्षणे संपादित करता येणार नाही असाही ठराव झाला असल्याचे निदर्शनास आणले आहे.दरम्यान याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे (रिटपीटीशन नं.-९८३२/२०१७ व ९८३३/२०१७ आरक्षण उठविण्यासाठी दावा दाखल केला होता.त्या याचिकेत औरंगाबाद खंडपिठाच्या निकालानुसार हे आरक्षण रद्द करण्यात आले असल्याचा खुलासा करून सत्ताधारी गटाच्या घशात दात घातला आहे.व असा आरोप करून खोटेनाटे आरोप कराल तर अडचणीत याल याचे भान ठेवा असा इशारा अध्यक्ष वहाडणे यांनी दिला आहे.

अखेर खुलासा करताना नगराध्यक्ष वहाडणे यांनी पुढे म्हटले आहे की.”कोल्हे व त्यांच्या सहकाऱ्यांना खरोखरच क्रीडांगणाची काळजी असेल तर त्यांनी “इंडोअर गेम हॉल” मैदानावरील अतिक्रमणे उठविण्याची लेखी मागणी करावी आपण मात्र ही अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपरिषदे मार्फत नोटिसा बजावल्या आहेत.तुमच्यात आहे का हिंमत ?” असा सवाल उपस्थितीत करून मतांच्या लाचारीमुळे तुमच्यात ती धमक नाही,तुमचा भेकडपणा शहरातील नागरिक जाणत असल्याचे म्हटलें आहे.तुमच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असेलेल्या महापुरुषांचे (?) पराक्रमही अजून बाहेर येतीलच.जरा वाट पहा असे म्हणून नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी इशारा देऊन आगामी लक्ष निर्धारण करून सत्ताधाऱ्यांना चोख इशारा दिला आहे. त्यामुळे आता भाजप कोणता बाण आपल्या भात्यातून काढतो व हा संघर्ष कोणते स्वरूप धारण करतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close