जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अवैध वाळूवाहतुकी संबधी नगरपरिषदेने केले बैठकीचे आयोजन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव( प्रतिनिधी)

वाळू वाहतूक सुरू झाल्यावर कोपरगाव शहरातून मोठमोठे अवजड डंपर,ट्रक,ट्रॅक्टर,वाळू वाहतूक करणार असून या वाहतुकीमुळे शहरातील-परिसरातील रस्त्यांची आहे त्यापेक्षा जास्त दुरवस्था झाल्याशिवाय राहणार नाही.अपघातांची संख्याही वाढू शकते.त्यामुळे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात बुधवार दि.२७ जानेवारी रोजी एक बैठक आयोजित अकरण्यात आली असून या बैठकीसाठी नागरिकांनी उपस्थित राहून विधायक सूचना कराव्या असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धि पत्रकान्वये केले आहे.

शहरातील रस्त्यांची दुरावस्था होऊ नये,खड्डे पडून अपघात होऊ नयेत,प्रदूषण होऊ नये म्हणून “कोपरगाव शहरातून वाळू वाहतूक होऊ नये “या विषयी चर्चा करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात बुधवार दि.२७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली आहे.कोपरगाव शहरातील जागरूक नागरिकांनी उपस्थित रहावे-विजय वहाडणे,नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

वाळू हा विषय अतिशय संवेदनशील बनला असून या प्रश्नावर अनेक जण गप्प बसने पसंत करत आहे.जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी अवैध वाळू वाहतुकीस प्रतिबंध केलेला आहे.तरीही अनेक जण झटपट पैसा मिळत असल्याने या व्यवसायात उतरून आपले उखळ पांढरे करत आहे.त्यात राजकीय नेत्यांनी आपले उखळ पांढरे केले असून त्यांचे चेलेही त्यात मागे नव्हते.त्यामुळे शहरातील व नजीकच्या ग्रामपंचायत रस्त्यांची वाट लागली होती.त्यामुळे आताही अवळूच्या निविदा प्रसिद्ध झाल्याच्या बातम्या आहे.त्यामुळे यावेळेस ही हा हा शिमगा रंगणार असे दिसते आहे.या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका सहविचार सभेचे आयोजन केले असून जनहितार्थ सूचना संग्रहित करून त्यानुसार कारवाई करण्यासाठी पालिका कार्यलयात एका बैठकीचे आयोजन केले आहे.त्यात नागरिकांनी आपल्या विधायक सूचना कराव्या असे आवाहन केले आहे.त्यात अध्यक्ष वहाडणे यांनी पुढे म्हटले आहे की,”सध्या प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे नियोजन आहे.कोपरगाव शहरातून वाळू वाहतूक होऊ नये यासाठी आपण स्वतः उभे राहून इंदिरा पथ येथे वाळूचे अवजड डंपर अडविले होते.पण वाळूवाल्यांची दहशत असल्याने कुणीच साथ देत नाही,बोलत नाही,विरोध करत नाही.राजकारणी मंडळीच या अवैध वाळुवाल्याचे आश्रयदाते असल्याने त्यावेळी कुणीच बोलले नाही.शहरातील रस्त्यांची दुरावस्था होऊ नये,खड्डे पडून अपघात होऊ नयेत,प्रदूषण होऊ नये म्हणून “कोपरगाव शहरातून वाळू वाहतूक होऊ नये “या विषयी चर्चा करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात बुधवार दि.२७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली आहे.कोपरगाव शहरातील जागरूक नागरिकांनी उपस्थित रहावे ही विनंती.समाजासाठी ज्यांना कुणाशीही वाईटपणा घ्यायचाच नाही अशा सद्ग्रहस्थांनी शक्यतो बैठकीला यायचे टाळावे.ही बैठक भाषणबाजी करण्यासाठी नसून फक्त सूचना करण्यासाठी आहे असे आवाहनही नगराध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close