कोपरगाव तालुका
वर्तमानात कायद्याचे ज्ञान आत्मसात करण्याची गरज
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
प्रत्येकाला कायद्याचे ज्ञान असणे महत्त्वाचे असून सार्वजनिक जीवनात वाटचाल करतांना कायद्याचे ज्ञान आत्मसात करुन धैर्याने जीवनातील वाटचाल करा.असे समुपदेशन कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
अहमदनगर पोलिस दलाचे पोलिस अधिक्षक मनोज पाटील मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे पुढाकारातून कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे हद्दीत पोलिस दल स्थापना दिवस साजरा केला जात असून त्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेचे डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालय येथे विद्यार्थीनींना समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून स.पो.नि.दिपक बोरसे बोलत होते.
कार्यक्रमास सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके,पर्यवेक्षक मंगला राजेभोसले,अरुण गोरे,दिपक टाफरे,गोपनीय शाखेचे राम खारतोडे उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले,बालक आणि पालक यांच्यातील फरक समजावून सांगत अल्पवयीन मुलींनी काळजी घेवून संभव्य धोका टाळावा असे सांगत स्व-रक्षणाची, वाहतुकीच्या संदर्भात विविध माहिती सांगत आत्म निर्भर व्हावे.असे सांगितले.कार्यक्रमास शाळेच्या प्राचार्या मंजुषा सुरवसे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रविण निळकंठ यांनी केले.