जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावचा कोरोना कालखंड अविस्मरणीय-तहसीलदार

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावातील महसूल विभागाच्या सेवेत रुजू झाल्यापासून कोरोनाचा कालखंड आपल्याला अविस्मरणीय ठरला असून तो आपल्या उर्वरित कालखंडात नक्कीच उपयुक्त ठरेल असा आशावाद कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी नुकताच एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला आहे.

कर्तव्यदक्ष पत्रकार असतील तर प्रशासनाला काम करताना प्रेरणा मिळत असल्याचे विशद करून कोपरगावातील पत्रकारांनी व सामाजिक संस्थांनी मदत केल्यानेच परप्रांतीय नागरिकांना कोरोना कालखंडात आपल्या घरी जाण्यास व त्यांची भोजन व्यवस्था करण्यास मदत मोठी मदत मिळाली-तहसीलदार योगेश चंद्रे,कोपरगाव.

कोपरगाव येथील तहसिल कार्यालयात कोरोना नियंत्रण समितीच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने कोरोना संसर्ग निर्मुलन अभियानात विविध माध्यमांचे प्रतिनिधी यांचा विशेष प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
याप्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर,विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे (आव्हाड),जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नानासाहेब जवरे,डॉ.अरुण गव्हाणे,राजेंद्र सालकर,मनिष जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.दरम्यान दिवंगत पत्रकार अशोक खांबेकर,पांडुरंग रायकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

त्या वेळी पुढे बोलताना म्हणाले की,”सुरुवातीला कोरोना कालखंडात कोणालाही काय करावे हे समजत नव्हते या साठीबद्दल सर्वच जण अनभिज्ञ होते.त्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते.मात्र जसजसा कालखंड पुढे सरकत गेला तसतसे पत्रकारांच्या विविध सुचनांच्या द्वारे मार्ग सापडत गेला.काळ प्रतिकूल होता.तरीही महसूल,पोलीस,आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून मार्ग काढत गेलो.काही वेळेस कठोर भूमिका घ्यावी लागली त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणणे शक्य झाले अद्याप दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे बेसावध राहून चालणार नाही.त्यामुळे आगामी काळात अन्य विषाणू पुन्हा अवतरीत झाल्याने आगामी कालखंड जोखमीचा असल्याने आपल्याला सावध राहावे लागणार आहे.आपल्या सेवेची सुरुवात आदिवासी नंदुरबार जिल्ह्यात झाली त्या ठिकाणी साडेचार वर्ष सेवा करण्याची आपल्याला संधी मिळाली.त्या ठिकाणी काम करणे आव्हानात्मक होते.त्या ठिकाणी मराठे नावाच्या पत्रकारांची त्यांनी आवर्जून आठवण काढली व त्या प्रतिकूल काळात त्यांनी केलेली मदत व मार्गदर्शन त्या भागासाठी नाही तर सर्वांना मार्गदर्शक ठरेल असे होते.काही वाड्या-पाड्यात जाण्यासाठी नर्मदेच्या बॅकवाटर मधून शंभर की.मी.चा मार्ग काढून जावे लागत असे तरी एक पत्रकार वेळ आणि त्रासाची तमा न बाळगता आपले कर्तव्य बजावत असे त्याने आपण प्रभावित झालो असून त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे सरकारला बोट अँबूलन्स उपलब्ध करून द्यावी लागली व वाड्या-पाड्यावर एक वैद्यकीय कर्मचारी,अधिकारी,नर्स यांची नेमणूक करून त्या भागातील नागरिकांची प्राथमिक व पायाभूत गरज पूर्ण करावी लागली असल्याचे स्मरण त्यानीं करून दिले व असे पत्रकार असतील तर प्रशासनाला काम करताना प्रेरणा मिळत असल्याचे विशद करून कोपरगावातील पत्र कारांनी व सामाजिक संस्थांनी मदत केल्यानेच परप्रांतीय नागरिकांना कोरोना कालखंडात आपल्या घरी जाण्यास व त्यांची भोजन व्यवस्था करण्यास मदत मिळाल्याचे कौतुकोद्गारही त्यानी काढले आहे.पत्रकांरांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी प्रास्तविक यांनी तर सुत्रसंचलन समन्वयक सुशांत घोडके यांनी केले.तर आभार विजय कापसे यांनी मानले.कार्यक्रमास कोपरगाव प्रेस क्लब,कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,कोपरगाव तालुका तसेच विविध वृत्तपत्रे यांचे प्रतिनिधी,इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे प्रतिनिधी,छायाचित्रकार यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close