जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..हा मतदारांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न-नगराध्यक्ष

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रिया सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावाला २५-३० लाख रुपये देण्याचे आमिष दाखविले जात आहे.जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा आत्मा पवित्र “मतदान”आहे. पण मतदारांच्या हक्कावर गदा आणण्याचा हा प्रयत्न निषेधार्ह असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.

राज्यातील काही ग्रामपंचायतीत मात्र नामनिर्देशन पत्र भरण्याआधीच काहींनी सरपंचपदाची कोट्यवधी रुपयांत बोली लावल्याच्या धक्कादायक घटना उघड झाल्या आहेत.काही ठराविक धनाढ्य प्रवृत्तीची मनगटशाही मतदारांच्या माथी मारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.घटनाकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नांवाचा रात्रंदिवस गजर करणाऱ्या नेत्यांना घटनेचा विसर पडलेला दिसतो-नगराध्यक्ष विजय वहाडणे,कोपरगाव नगरपरिषद.

वर्तमानात ग्रामपंचायत निवडणूक सुरु असून राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींची निवडणूक सुरु आहे.येत्या १५ जानेवारी रोजी मतदान संपन्न होत आहे.मात्र राज्यातील काही ग्रामपंचायतीत मात्र नामनिर्देशन पत्र भरण्याआधीच काहींनी सरपंचपदाची कोट्यवधी रुपयांत बोली लावल्याच्या धक्कादायक घटना उघड झाल्या आहेत.काही ठराविक धनाढ्य प्रवृत्तीची मनगटशाही मतदारांच्या माथी मारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.घटनाकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नांवाचा रात्रंदिवस गजर करणाऱ्या नेत्यांना घटनेचा विसर पडलेला दिसतो.अपवाद म्हणून (तशी परिस्थिती ओढवली असेल तरच) एखाद्या ठिकाणी असे करायला हरकत नाही.असा दावा करून त्यांनी पुढे म्हटले आहे की,”काही ठिकाणी तर सरपंच पदाची बोली लावून लिलाव करण्याचे उद्योग सुरू आहेत.समाजसेवक अण्णा हजारे यांनी ही अशा गैरप्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.लिलाव पद्धतीमुळे लोकशाहीची कुचेष्टाच होत आहे.वर्षानुवर्षे जनतेच्या मानगुटीवर बसलेलेच पैशाचा वापर करून पडद्याआड राहून पदांचा कब्जा घेणार यात शंका नाही.सरपंच पदाचा लिलाव झाला तर सर्वत्र वाळूचोर,अवैध व्यवसाय करणारे,नेत्यांचे भाटच सरपंच पदावर बसतील व ग्रामविकासासाठी येणाऱ्या योजना,प्रचंड निधी खिशात घालून लिलावात गुंतविलेले पैशांची वसुली करतील.सरपंच पदावर बसून प्रचंड माया जमवायची व पुन्हा येणाऱ्या निवडणुकीत तोच पैसा वापरून पुन्हा सरपंचपद विकत घ्यायचे.या दुष्टचक्रात अडकून लोकशाहीचे धिंडवडे निघणार असतील तर शासनानेच अशा प्रकरणांना आळा घालणे गरजेचे आहे असे आवाहन वहाडणे यांनी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close