जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात गुन्ह्यांचा आलेख लक्षणीय रित्या वाढला

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील टिळकनगर उपनगरातील फिर्यादी उमेश गोरख देसाई (वय-२९) यांना त्याच भागातील आरोपी तुषार राजेंद्र दुशिंग,अनिल माधव वैरागळ,ओम सुनिल कोपरे यांनी दारू पिऊन विनाकारण शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघड झाली असून शहरात कोपरगाव शहर पोलिसांचा वचक नाहीसा झाल्याचे उघड-उघड दिसून येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोपरगाव शहरात गत महिन्यात वरिष्ठ पोलिसांच्या बदल्या झाल्यापासून पोलिसांचा वचक नसल्यात जमा झाला असून शहरात दिव्याखाली अंधार निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.वरिष्ठ अधिकारी वगळता सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद तोच आहे.तरीही केवढा बदल झाल्याचे दिसत आहे.त्यामुळे अवैध व्यवसाय बोकाळले आहे.पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर धक्कादायकरित्या चोऱ्या होऊ लागल्या आहेत.

कोपरगाव शहरात गत महिन्यात वरिष्ठ पोलिसांच्या बदल्या झाल्यापासून पोलिसांचा वचक नसल्यात जमा झाला असून शहरात दिव्याखाली अंधार निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.वरिष्ठ अधिकारी वगळता सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद तोच आहे.तरीही केवढा बदल झाल्याचे दिसत आहे.सर्व नुकतीच भाजीपाला लिलावाच्या जागी सुभाषनगर परिसरात एका गंगापूर तालुक्यातील नागरीकास लुटण्याची धक्कादायक घटना घडली तर त्या नंतर भर गांधी चौकात सुदेश चित्रपट गृहासमोरील मेडिकल चोरट्यानी फोडले असून त्याचा तपास लागलेला नाही.अन्य छोट्या-मोठ्या चोऱ्या वेगळ्याच आहे. टिळकनगर,गांधीनगर परिसरात असलेले गुंड-पुंड चोरटे पुन्हा एकदा डोके वर काढू लागले असल्याचे दिसत आहे.अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात बोकाळले आहे.त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी आपली निर्णायक भूमिका निभावणे क्रमप्राप्त झाले आहे.मात्र त्या पातळीवर शुकशुकाट दिसून येत आहे.पोलीस अधिकाऱ्यांवर राजकीय नेत्यांचा अंकुश राहिला का नाही ? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.या दोन्ही पातळ्यांवर शुकशुकाट आहे.या बाबत सामाजिक संघटना व राजकीय संघटनांनी आश्चर्यकारक मौन पाळले आहे.अपवाद केवळ राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांचा ठरला आहे.सत्तेत असूनही वास्तव मांडण्याचे धाडस त्यांनी दाखवले आहे.सत्ताधारी पक्षांचे फलक सुरक्षित नसतील व त्याचा धाक जर असामाजिक तत्वांवर नसेल तर बेदिली माजायला वेळ लागत नाही.वर्तमान स्थिती हा त्याचा पुरावा मानायला हवा इतकी कायदा सुव्यवस्था ढासळली आहे.अशीच घटना नुकतीच घडली असून फिर्यादी हा पल्या मित्रांसोबत बसला असताना दारू पिऊन येणाऱ्या आरोपीं तुषार राजेंद्र दुशिंग,अनिल माधव वैरागळ,ओम सुनिल कोपरे यांनी दारू पिऊन विनाकारण शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे.दारु पिवुन विनाकारण फिर्यादीस शिवागाळ करुन लाथाबुक्क्यांनी केली तसेच मला जिवे ठार मारण्यचे उद्देशाने यातील आरोपी अनिल वैरागळ याने दोन्ही हाताने पकडुन आरोपी राजेंद्र दुशिंग याने त्याचे हातातील लोखंडी कोयत्याने फिर्यादीचे डाव्या हाताचे कांबीवर वार करुन दुखापत केली तसेच आरोपी ओम कोपरे याने साक्षीदार यांना लाथा बुक्क्यांनी मारहान करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच फिर्यादीची एच.एफ.डिलक्स मो.सा.नं.एम.एच-१७ सी.सी.८४१ हीचे शिट पेटवुन नुकसान करुन फिर्यादीचे घरावर दगड फेक करण्याचे धाडस दाखवले व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.हे विशेष ! हि स्थिती काही वर्षा पूर्वी कोपरगावात होती.व पुन्हा पाच-सहा वर्षांनी तीच स्थिती निर्माण झाली आहे.

कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२/२०२१ भा.द.वि.कलम-४९८ (अ)३०७,३२३,५०४,५०६,४३५,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close