जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात आज विक्रमी ४०० नामनिर्देशन दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात ३४ जिल्ह्यांमधील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आजपासून २३ डिसेंबर सुरुवात झाली आहे.नामनिर्देशन पत्र भरण्याच्या आज सातव्या दिवशी कोपरगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीत १९५ पुरुषांचे तर २०५ महिलांचे असे एकूण ४०० अर्ज दाखल झाले असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.

दरम्यान आज ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास सर्व्हरची सेवा खंडित झाल्याने व त्याच्या तक्रारी थेट मुंबई पर्यंत निवडणूक आयोगाकडे गेल्याने त्याची दखल तातडीने निवडणूक आयोगाने घेतली व नामनिर्देशन पत्र भरण्याचे कोणी राहू नये यासाठी खबरदारी घेऊन ती मुदत दुपारी तीन वाजे पर्यंत असते मात्र ती मुदत सायंकाळी ५.३० पर्यंत वाढवून दिली होती.त्याबद्दल इच्छुकांनी समाधान व्यक्त केले आहे.

राज्यातील १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे.शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी,भाजप,मनसे या सर्वच प्रमुख पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या रिंगणात उडी घेतली आहे.त्यामुळे गाव पातळीवरील निवडणुका रंगतदार होणार आहे.मात्र सरपंचाचे आरक्षण नंतर जाहीर होणार असल्याने ग्रामपंचायतीची रया गेल्याचे दिसत आहे.व खर्च करण्यासाठी जो-तो एकमेकांकडे पाहत आहे.तसा कोपरगावात हा खेळ साखर सम्राटांना नवा नाही त्यामुळे या तालुक्यात फार काही निष्पन्न होण्याची शक्यता कमीच आहे.या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत स्वीकारले जात असून सलग तीन दिवस सुट्या असल्याने आज सातव्या दिवशी नामनिर्देशन स्वीकारण्यास इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती.शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.असे आधीच निवडणूक आयोगाने जाहीर केले होते.त्यामुळे तीन दिवस हि प्रक्रिया बंद होती.तिला आज सातच्या दिवशी मोठी गती आली आहे.आज दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रात प्राप्त अर्ज पुरुष व पुढे स्रिया दर्शविल्या असून पुढे शेवटी आलेले एकूण अर्ज दर्शवले आहेत

उक्कडगाव-१०-१०-२०,तीळवणी-०८-१२-२०,अंजनापूर-००-००-००,घारी-०१-००-०१,मनेगाव-०४-०१-०५,मळेगाव थडी-०८-०७-१५,सांगवी भुसार-००-००-००,वेळापूर-०५-०६-११,जेऊर पाटोदा-०४-०८-१२,काकडी-००-००-००,नाटेगाव-००-००-००,कासली-००-०३-०३,ओगदी-०३-०४-०७,अंचलगाव-०६-०७-१३,कोळगाव थंडी -१२-१०-२२,मायगाव देवी-०३-०३-०६,हिंगणी-०८-१०-१८,रवंदे-१२-१४-२६,संवत्सर-३७-३१-६८,देर्डे चांदवड-०८-१०-१८,मढी खुर्द-०६-०६-१२,मढी बुद्रुक-०९-०९-१८,धोंडेवाडी-०१-०२-०३,सोनारी-००-००-००,आपेगाव-०६-०८-१४,येसगाव-०६-०९-१५,टाकळी-०६-०७-१३,कोकमठाण-२५-२२-४७,जेऊर कुंभारी-०७-०६-१३ असे एकूण १९५ पुरुषांनी २०५ असे एकूण ४०० जणांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यानी दिली आहे.आता दिवसागणिक या निवडणुकीत रंग भरला जाणार असून कोपरगाव तालुक्यात ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता कमीच असून तसे प्रोत्साहन देताना सत्ताधारी व विरोधक कोणीही दिसत नाही.उद्या आता शेवटचा दिवस असल्याने सर्वाधिक गर्दी उसळणार आहे.

नामनिर्देशन भरण्याची अखेरची मुदत ३० डिसेंबर आहे.त्यामुळे अद्याप एक दिवस शिल्लक असल्याने या दिवशी जास्त अर्ज दाखल होणार आहे.त्यांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होईल.नामनिर्देशनपत्रे ०४ जानेवारी २०२१ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल.मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ०५.३० या वेळेत होईल.मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close