जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पाणी प्रश्नासाठी १०५ कोटींचा प्रस्ताव अंतिम टप्यात-आश्वासन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराला सध्या ६ दिवसाड पाणी पुरवठा होतो.पालीकेकडे पाणी साठवण क्षमता कमी असल्याने पाण्याचा गंभिर प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी १०५ कोटी रूपयांचा नवा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात केले आहे.

“आ.काळे आमदार झाल्या पासुन नव्हे तर आपण जसे नगराध्यक्ष झालो तेव्हापासून शहराच्या विकास कामात पुर्ण सहकार्य करीत आहेत.म्हणुनच गेल्या १० वर्षात जितके कामे झाले नसतील त्यापेक्षा अधिक कामे ४ वर्षात झाली.यापुढेही कोट्यावधी रुपयांची कामे होणार आहेत”-नगराध्यसक्ष विजय वहाडणे

सर्वसाधारण रस्ता अनुदान अंतर्गत कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान परिसर काँक्रिटीकरण (अंदाजे खर्च १८ लाख ५३ हजार) व प्रभाग क्रमांक सहा मधील नाथाभाऊ घर ते राममंदिरापर्यंत डांबरीकरण करणे (अंदाजे खर्च (२१ लाख १९ हजार) या कामांचा मंगळवार (दि.२९) शुभारंभ आ.काळे यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे,राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते विरेन बोरावके,नगरसेवक मंदार पहाडे,मेहमुद सय्यद,संदीप पगारे,नगरसेविका प्रतिभा शिलेदार,वर्षा शिंगाडे,उद्योजक कैलास ठोळे,चंद्रकांत अजमेरे,शिवसेनेचे शहर प्रमुख कलविंदर दडियाल,भरत मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारुन कामाचा शुभारंभ करण्यात आला.पुढे बोलतांन आ. काळे पुढे बोलताना म्हणाले की,”शहराचा पाणी प्रश्न गंभिर झाल्याने पालीकेच्या तलावांची साठवण क्षमता वाढविण्यासाठी विषेश प्रयत्न केला आहे.नविन पाच नंबर तलावाचे ३० टक्के काम झाले आहे उर्वरित ७० टक्के तलावाचे काम व शहरातील वाढीव पाईपलाईनच्या कामा करीता १०५ कोटी रूपये निधीची गरज आहे ती निधी मिळविण्यासाठी आपण जिल्हाधिकारी,महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण विभागाच्या मार्फत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आहे.नविन वर्षात १०५ कोटीच्या निधीला अंतिम मंजुरी मिळणार असल्याचे सांगून शहरवासीयांना नव्या वर्षाच्या अनोख्या शुभेच्छा आमदार काळे यांनी दिल्या. नगरपालीकेच्या निवडणुकीत आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला तरीही वहाडणे यांना शहर विकासकामत सतत सहकार्य केले म्हणूनच इतके विकासकामे गतीमान होत आहेत.कोपरगाव शहराच्या विकासाचे अनेक प्रस्ताव शासनदरबारी पाठविले असून त्याबाबत पाठपुरावा सुरू असून त्या प्रस्तावांना देखील लवकरच मंजुरी मिळणार आहे.आपण माझ्यावर दाखविलेल्या विश्वासातून कोपरगाव शहराच्या विकासासाठी मी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन आ.काळे यांनी शेवटी दिले आहे.

सदर प्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे,नगरसेवक मंदार पहाडे,प्रतिभा शिलेदार,मेहमुद सय्यद,कलविंदर दडियाल यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला नगराध्यक्ष विजय वहाडणे,कैलासशेठ ठोळे,चंद्रकांतशेठ ठोळे, दिलीपशेठ अजमेरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष,शिवसेना शहराध्यक्ष कलविंदर डडियाल,नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके,मंदार पहाडे,प्रतिभा शिलेदार, मेहमूद सय्यद,वर्षा शिंगाडे,अजीज शेख,राजेंद्र वाकचौरे,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार,विद्यार्थी अध्यक्ष स्वप्नील पवार,डॉ.अमोल अजमेरे,रमेश गवळी,कृष्णा आढाव,फकिर कुरेशी,भरत मोरे,सुनील बोरा,बाळासाहेब रुईकर,राहुल देवळालीकर,जावेद शेख,आदी उपस्थित होते.यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंलन माजी नगरसेवक रमेश गवळी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close