जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…या तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरासह मतदार संघातील मढी बु.चांदगव्हाण,जेऊर पाटोदा,माहेगाव देशमुख,मळेगाव थडी या गावातील जवळपास ४.२६ कोटीच्या रस्ते व विकास कामांचे आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

  

दरम्यान यातील एमडीआर ८५ बाबासाहेब पानगव्हाणे घर ते ज्ञानेश्वर खैरनार वस्ती रस्त्यावर सीडी वर्क करणे,१० लक्ष रुपये निधीतून चारी नं.६ ज्ञानेश्वर खैरनार वस्ती ते सुनिल जाधव वस्ती रस्ता खडीकरण करणे व १५ लक्ष रुपये निधीतून कोळपेवाडी माहेगाव शिव ते मारुती काळे वस्ती (चर रस्ता) खडीकरण करणे आदी कामाचा समावेश आहे.

यामध्ये मढी बु.येथे ५० लक्ष रुपये निधीतून रस्त्यांच्या कामाचे व १ कोटी १६ लक्ष रुपये निधीतून ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकासकामांचे,चांदगव्हाण येथे २० लक्ष रुपये निधीतून ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधणे व २० लक्ष रुपये निधीतून रस्त्यांच्या कामाचे,जेऊर पाटोदा येथे ३० लक्ष रुपये निधीतून ईशान्यनगर ते ज्ञानेश्वर बाचकर घर रस्ता डांबरीकरण करणे व २० लक्ष रुपये निधीतून सखाराम आव्हाड घर ते माधव केकाण घर रस्ता खडीकरण करणे. माहेगाव देशमुख येथे १० लक्ष रुपये निधीतून चारी नं.५ ग्रामा ३० ते कुंभारी शिव गोकुळ घुले घर रस्ता खडीकरण करणे,१० लक्ष रुपये निधीतून चारी नं.५ ते गणपत रोकडे घर रस्ता खडीकरण करणे,१० लक्ष रुपये निधीतून चारी नं.५ बबन रायभाने घर ते शंकर ठाकरे घर रस्ता खडीकरण करणे,१० लक्ष रुपये निधीतून प्रजिमा ८५ डॉ.कापरे ते विजयराव कदम चारी नं.५ रस्ता खडीकरण करणे,१५ लक्ष रुपये निधीतून मुस्लिम कब्रस्तान संरक्षक भिंत बांधणे,५० लक्ष रुपये निधीतून एम.डी.आर ८५ बाबासाहेब पानगव्हाणे घर ते ज्ञानेश्वर खैरनार वस्ती रस्ता डांबरीकरण करणे,१० लक्ष रुपये निधीतून चारी नं.५ कदम वस्ती ते कोळपेवाडी शिव रस्ता खडीकरण करणे, एमडीआर ८५ बाबासाहेब पानगव्हाणे घर ते ज्ञानेश्वर खैरनार वस्ती रस्त्यावर सीडी वर्क करणे,१० लक्ष रुपये निधीतून चारी नं.६ ज्ञानेश्वर खैरनार वस्ती ते सुनिल जाधव वस्ती रस्ता खडीकरण करणे व १५ लक्ष रुपये निधीतून कोळपेवाडी माहेगाव शिव ते मारुती काळे वस्ती (चर रस्ता) खडीकरण करणे,मळेगाव थडी येथे २० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या मळेगाव थडी कमान ते गोदावरी नदी रस्ता डांबरीकरण करणे आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

  यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे संचालक,माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,माहेगाव देशमुख व मळेगाव थडी,मढी बु.,चांदगव्हान व जेऊर पाटोदा येथील विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

  दरम्यान अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या रस्त्यांचा प्रश्न मिटणार असल्याने नागरिकानीं समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close