कोपरगाव तालुका
राज्यात कॉंग्रेसला बळ देणार-यादव
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्याचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात व आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच कॉंग्रेस याठिकाणी उभारी घेईल व कार्यकर्त्याला बळ देउन सर्वच विभागाला सक्षम करण्याचे काम थोरात यांच्या नेतृत्वाखाली केले जाईल असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश समन्वयक बंटी यादव यांनी कोपरगाव शहरात एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव शहर अध्यक्ष रविंद्र साबळे (अ.जा.) विभाग कोपरगाव यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या यात युनूस शेख,संजीव पाईक,सतीश साबळे,राजेंद्र पोटे,युनूस शेख,साऊंल गायकवाड, सविता विधाते,यादव त्रिभुवन, मयूर गोरे आदि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
कोपरगाव शहरात समता सहकारी संस्थेच्या सभागृहात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची संघट्नात्मक बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सदर प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यावेळी नितीन शिंदे,उमेश शेजवळ,चंद्रकांत बागुल,सविता विधाते,अड.शीतल देशमुख,ज्ञानेश्वर भगत,शब्बीर भाई शेख,श्री पाडेकर,चंद्रहार जगताप, शितल देशमुख, रेखा जगताप,स्नेहल वाघमारे,सोनाली शिंदे,वैशाली पाईक आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी कार्यकर्त्याला प्रोत्सान देवून प्रत्येक प्रभागात शाखा काढण्याचे आदेश दिले आहे.
यावेळी नितीन शिंदे,उमेशजी शेजवळ,चंद्रकांत बागुल, सविता विधाते,अड. शीतलताई देशमुख,ज्ञानेश्वर भगत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.
या कार्यक्रमासाठी मनोज बिडवे,यादव अण्णा त्रिभुवन तसेच कोपरगाव शहर अध्यक्ष रविंद्र साबळे (अ.जा.) विभाग कोपरगाव यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या यात युनूस शेख,संजीव पाईक,सतीश साबळे,राजेंद्र पोटे,युनूस शेख,साऊंल गायकवाड, सविता विधाते,यादव त्रिभुवन, मयूर गोरे आदि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.