जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात दुचाकीची चोरी गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

मूळ जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी मात्र नोकरी निमित्त कोपरगावातील स्पंदना स्पुर्ती ऑफिस समोर रहिवाशी असलेले इसम बळीराम शिवदास चव्हाण (वय-२३) फायनान्स यांची बजाज पल्सर हि चाळीस हजार रुपये किमतीची दुचाकी (क्रं.एम.एच.१९ डी. एल.४७९३) हि अज्ञात चोरट्याने नुकतीच रात्रीच्या सुमारास अज्ञात कारणासाठी पळवून नेली असल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

फिर्यादी बळीराम चव्हाण यांनी आपली वरील क्रमांकाची दुचाकी हि आपल्या घरासमोर उभी करून ठेवलेली असताना दि.१७ डिसेंम्बरच्या रात्री अकरा वाजता उभी करून ठेवलेली असताना अज्ञात चोरट्याने कधीतरी पाळत ठेऊन घराबाहेर कोणी नाही हि संधी साधत फिर्यादीच्या समंती शिवाय आपल्या फायद्यासाठी पळवून नेली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी हे फायनान्स कंपनीत नोकरीस असून ते वरील ठिकाणी हल्ली नोकरी निमित्त वास्तव्य करतात.ते मूळचे लिहा तांडा शेंदुर्णी ता.जामनेर जिल्हा जळगाव येथील रहिवाशी आहेत.त्यांनी आपली वरील क्रमांकाची दुचाकी हि आपल्या घरासमोर उभी करून ठेवलेली असताना दि.१७ डिसेंम्बरच्या रात्री अकरा वाजता उभी करून ठेवलेली असताना अज्ञात चोरट्याने कधीतरी पाळत ठेऊन घराबाहेर कोणी नाही हि संधी साधत फिर्यादीच्या समंती शिवाय आपल्या फायद्यासाठी पळवून नेली आहे.या प्रकरणी फिर्यादी बळीराम चव्हाण यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं. भा.द.वि कलम ३७९ अन्वये अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.जी.ससाणे हे करीत आहेत.दरम्यान नुकतीच डॉ.राजेश माळी यांच्या रुग्णालयाच्या पार्किंग मधून एक्स रे ऑपरेटर देवकर यांची एक दुचाकी नुकतीच चोरी गेली असताना हि लागोपाठ दुसरी घटना घडली आहे.त्यामुळे दुचाकीस्वारात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close