जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात नगरसेवक-ठेकेदाराची हाणामारी !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेचे गांधीनगर येथील सवत्या सुभ्यातून लढलेले नगरसेवक व त्या प्रभागात गटारीचे काम करणारे राघोबादादा वाड्यांनजीक रहिवाशी असलेले ठेकेदार यांच्यात गटारीच्या कामाच्या कारणावरून काल सकाळी तुंबळ हाणामारी झाली असल्याची विश्वसनिय खबर मिळाली असून याबाबत दोन्ही गट कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता तेथे नगराध्यक्ष व काही नगरसेवकांनी या दोन्ही गटात समझोता घडवून आल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

ठेकेदाराने अन्यत्र खोदाई काम सुरु केल्याने त्या प्रभागातील नागरिकांनी नगरसेवकांकडे तक्रार केली होती.व त्या असंबद्ध कामाबद्दल नागरिकांनी कठोर शब्दात फटकारले होते.त्यामुळे नगरसेवक महाशयांचा पारा चढला होता.त्यांनी त्या रागातून ठेकेदार यांना व त्यांच्या घरातील अन्य काम पाहणाऱ्या माणसांना दूरध्वनी केला असता त्यांना फटकारले त्यातून हा वाद वाढला होता.मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव नगरपरिषदेने निविदा काढून त्याचे काम वर्तमानात सुरु आहे.मात्र सदरचे काम सोडून ठेकेदाराने अन्यत्र खोदाई काम सुरु केल्याने त्या प्रभागातील नागरिकांनी नगरसेवकांकडे तक्रार केली होती.व त्या असंबद्ध कामाबद्दल नागरिकांनी कठोर शब्दात फटकारले होते.त्यामुळे नगरसेवक महाशयांचा पारा चढला होता.

त्यांनी त्या रागातून ठेकेदार यांना व त्यांच्या घरातील अन्य काम पाहणाऱ्या माणसांना दूरध्वनी केला असता त्यांना फटकारले त्यातून हा वाद वाढला होता.व ठेकेदारांची घरची माणसे थेट नगरसेवकाच्या घरी पोहचले होते.त्यात नगरसेवकाने आपल्याला ठेकेदारांच्या माणसांनी थेट घरी येऊन आपल्याला,आपल्या पत्नीला मारहाण केल्याचा आरोप ठेकेदाराने केला आहे.तर ठेकेदारांच्या नातेवाईकांनी आपल्याला नगरसेवक यांनी अर्वाच्च शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे.

हा वाद थेट कोपरगाव शहर पोलीस स्थानकात गेला होता.त्या ठिकाणी दुर्धर आजाराने आजारी असलेल्या ठेकेदार यांना नगरसेवकाच्या नातेवाईकांने पोलीस ठाण्याच्या आवारात श्रीमुखात लगावली असल्याचे वृत्त आहे.नगरपरिषेदेचे एक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता.त्या नंतरही वाद शमण्याची चिन्हे दिसेना त्यामुळे कोपरगाव शहरातील आर.पी.आय.आठवले गटाचे एक प्रमुख पदाधिकारी यांनी मध्यस्ती करत दोन्ही गटांना जबाबदारीचे भान आणून दिल्याने पुढील अनर्थ सुमारे पाच तासांनी टळला आहे.व पोलीस ठाण्याचा एक गुन्हा सामोपचाराने कमी झाला आहे.या घटनेची शहरात उलटसुलट चर्चा सुरु आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close