जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात रुग्णवाढीला दिलासा

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण २५ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ०३ रुग्ण बाधित तर नगर येथे तपासणीसाठी स्राव पाठवले नाही तर नगर येथुन आलेल्या अहवालात एक ही स्राव बाधित आला नाही तर बाधित संख्येत खाजगी प्रयोग शाळेत ०१ रुग्ण बाधित आढळला आहे. आज एकूण ०४ जण बाधित आले आहे.तर आधी भरती असलेल्या १५ रुग्णांस उपचारानंतर सोडून दिले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.आज शहरात रुग्ण मोठ्या संख्येने आढळल्याने चिंतेचा विषय निर्माण झाला आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ६४ हजार ४६२ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ४६२ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत काही दिवसातील रुग्ण धरून ४१ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काळात ग्रामीण भागात अधिक प्रमाणावर रुग्ण वाढ होत असताना आज शहरात त्याची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.

दरम्यान कोपरगाव शहरात आज १२ रुग्ण आढळले आहे.त्यात बालाजी अंगण दोन पुरुष वय-१४,१२,गोकुळ नगरी येथील एक महिला वय-२०,लक्ष्मीनगर एक पुरुष वय-४८ आदींचा समावेश आहे.शहरात आज रुग्ण कमी झाल्याने समाधानाचे वातावरण पसरले आहे.मात्र शहर पोलिसानी आज बेताल नागरिकां विरुद्ध कारवाई सुरु केल्याने नागरिकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार ४९२ इतकी झाली आहे.त्यात ९५ रुग्ण सक्रिय आहेत. त्यामुळे आज पर्यंत ४१ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.६४ टक्के आहे.आतापर्यंत १७ हजार ४८५ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ६९ हजार ९४० इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १४.२५ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ०२ हजार ३५७ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ९४.५८ टक्के झाला आहे.दरम्यान आज शहरी भागात आज रुग्ण वाढ रोखली असल्याचे दिसत आहे.तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास पूर्ण रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close