अपघात
विहिरीत महिलेचा मृतदेह,घात की अपघात,चर्चा

न्यूजसेवा
शिर्डी -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायत हद्दीत आज सकाळी गट क्रमांक 122/1 मधील विहिरीत आज सकाळी विवाहित महिला जयश्री संदीप डांगे (वय -35) हिचा मृतदेह आढळून आला असून याबाबत विविध तर्कवितर्क करण्यात येत असून तिचा मृतदेह शिर्डी पोलिसांनी सकाळी 09 वाजता ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आला असून याबाबत मयत महिलेच्या वडील बाळासाहेब कचेश्वर थोरात (वय-55 ) यांनी याबाबत शिर्डी पोलिसांना खबर दिली आहे.

मयत महिला जयश्री डांगे ही काल ती तिच्या बहिणीचे 08 मे रोजी लग्न असल्याने पुऱ्या करण्यासाठी आपल्या माहेरी जवळके येथे आली होती.पुऱ्यांचा कार्यक्रम आटोपल्यावर सायंकाळी 06 वाजेच्या सुमारास वडिलांनी तिला दुचाकीवर जाऊन आपल्या सासरी शहापूर येथील वस्तीवर सोडून दिले होते.त्यानंतर ही घटना सकाळी उघडकीस आली आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,सदर महिला जयश्री बाळासाहेब थोरात हिचा विवाह सन-2012 साली जवळके येथे होऊन तिला शहापूर येथील संदीप डांगे या तरुणाशी लावून देण्यात आला होता.दरम्यान त्यांना वर्तमानात एक 11 वर्षाचा मुलगा आणि एक 09 वर्षाची मुलगी असा परिवार आहे.काल ती तिच्या बहिणीचे 08 मे रोजी लग्न असल्याने पुऱ्या करण्यासाठी आपल्या माहेरी आली होती.पुऱ्यांचा कार्यक्रम आटोपल्यावर सायंकाळी 06 वाजेच्या सुमारास वडिलांनी तिला दुचाकीवर जाऊन आपल्या सासरी शहापूर येथील वस्तीवर सोडून दिले होते.

दरम्यान आज सकाळी 07 विजेच्या सुमारास तिचा मृतदेह त्यांच्या वस्तीजवळ गट क्रमांक 112/11 मधील विहिरीत तरंगताना आढळून आला होता.त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.त्यानंतर तेथील काही नातेवाईकांनी याबाबत ही खबर तिचे वडील बाळासाहेब थोरात यांना कळवली होती.त्यांनी ही बाब तातडीने शिर्डी पोलिसांना कळवली होती.पोलिसांनी तिला तातडीने रुग्णवाहिकेतून शिर्डी येथील रुग्णालयात दाखल केले होते.येथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केलं आहे.तर पोलिसांनी तिचा पतीला ताब्यात घेतली असल्याची माहिती हाती आली आहे.

दरम्यान याबाबत शहापूर आणि परिसरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.याबाबत शव विच्छेदन अहवाल आल्यावर पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.दरम्यान मृत महिलेच्या तोंडावर आणि डोळ्यावर काही जखमांच्या खुणा असल्याची माहिती जवळच्या नातेवाईकांनी दिली आहे.त्यामुळे नेमका ही घटना आत्महत्या आहे का घातपात आहे यावर चर्चा होत आहे.
दरम्यान शिर्डी पोलिसांनी आज याबाबत आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.52/2026 भारतीय न्याय संहिता कलम 194 प्रमाणे नोंद केली असून सदरचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी रुग्णवाहिकेतून रवानगी केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल एस.एच.पंडित हे करीत आहेत.



