जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

बाजार तळावर व्यापारी गाळे बांधण्यासाठी प्रयत्नशील-आश्वासन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आगामी कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुका जवळ आल्याचे पाहून विरोधकांना आता विस्थापितांची उबळ आली असून सर्वांनीच एक मुखाने या गाळ्याची मागणी केली असल्याने आता पालिकेची नेमकी भूमिका नेमकी कोणती याकडे नागरिकांचे लक्ष लागले असताना आज पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपण कोपरगाव बाजार तळावर खोका शॉप करणार असल्याची घोषणा केली असून तसा प्रयत्न सुरु असल्याची माहिती आज नगर परिषद कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.त्यामुळे आता काही प्रमाणात या विस्थापितांना दिलासा मिळण्यास मदत मिळणार आहे.

नगरपरिषदेच्या लेख्याप्रमाणे एकूण ६१५ विस्थापित आहे.यातील प्रत्यक्षात अनेकांचे दुकाने सुरू आहे.मात्र ज्यांची आर्थिक कुवत नाही असे खरे गरजू विस्थापित दुकानदार केवळ ४५० च्या आसपास आहे.ज्यांची सोय झाली आहे अथवा ज्यांची आर्थिक क्षमता आहे त्यानी आपली नावे काढून घेतली तर बरे होईल असे आवाहन वहाडणे यांनी केले आहे.ज्यांनी बाजार पेठेत स्वभांडवल गुंतवले आहे त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी प्रारंभी घ्यावी लागेल-विजय वहाडणे,अध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक जवळ आली आहे.आगामी नोव्हेम्बर महिन्यात हि निवडणूक संपन्न होणार आहे.त्यामुळे आता या विस्थापितांची अनेकांना काळजी वाटू लागली आहे.त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न सत्ताधारी व विरोधकांकडून सुरु झाला आहे.या आधीच सत्ताधारी भाजपने या मुद्याला हवा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.त्यांनी गत सप्ताहात आपल्या समर्थक नगरसेवकांना पुढे करून हा मुद्दा तापविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.त्याला आपल्यावर हा मुद्दा शेकावयास नको म्हणून राष्ट्रवादीने लगेच उशीर न करता लागलीच आपले पत्ते उघड केले असून या विस्थापितांना आपला पाठिंबा असल्याचे सांगून भाजपाला लागलीच उत्तर दिले आहे.त्यामुळे शिवसेनेला मागे राहून उपयोगाचे नाही असे वाटले असेल तर ते स्वाभाविक मानले पाहिजे कारण त्यांनाही निवडणूक लढवायची असेल तर त्यांना एकतर्फी दोष देता येणार नाही या बाबत अद्याप काँग्रेसने आपले पत्ते उघड केलेले नाही अर्थातच काँग्रेसचे अस्तित्व येथे नगण्य असल्याने त्यांची भूमिका हि दोन रेड्यांच्या लढाईत सशाने उडी मारल्यासारखे होईल.त्यामुळे राहाता राहिला प्रश्न नरेंद्र मोदी मंच यांचा. मात्र आता नगरपरिषद अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आज खुलासा केल्याने आता या दोन बड्या नेत्यांची व त्यांच्या समर्थकांची भूमिका महत्वाची ठरणार हे ओघाने आलेच.त्यामुळे आजची पत्रकार परिषद महत्वाची मानली जात आहे.त्यामुळे आता विरोध नेमका कोणाचा याचा शोध विस्थापितांनी घेणे हि खरी जोखमीची बाब मानली जात आहे.या पार्श्वभूमीवर हि वहाडणे यांची भूमिका महत्वाची ठरणार हे ओघाने आलेच.

या पत्रकार परीषदेत त्यांनी आढावा घेताना,”शहरात एकूण किती ठिकाणी हे गाळे प्रस्तावित आहे याची प्रथम माहिती दिली आहे.त्यात त्यांनी धारणगाव रोड येथे ५४ खोका शॉप प्रस्तावित असून या खेरीज नगरपरिषदेने दि.२६ जुलै १०१८ रोजी ठराव क्रं.२६ अन्वये ठराव घेऊन पूनम थिएटर,एस.जी विद्यालय,पश्चिमेकडील भिंतीलगत,जलसंपदा विभागाच्या भिंतीलगत,येवला रोड शिव अटो नजीक,चर्च भिंतीजवळ,न्यायालयासमोर,बाजार तळ,बुब हॉस्पिटलच्या पश्चिमेस,धारणगाव रोड गौतम बँकेसमोर,टिळकनगर शॉपीजवळ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ आदी ठिकाणी हे खोका शॉप प्रस्तावित केले आहे.मात्र याला नगररचना विभागाने अडचण आणली आहे.या जागा देणे बाबत अहवाल देताना उचित नसल्याचे प्रतिकूल शेरे मारले आहे.त्यामुळे खरी अडचण झाली आहे.

धारणगाव रोड गौतम बँकेसमोर आपण निविदा काढल्या मात्र त्या विरोधात शहरातील नागरिक मंदार शंकरराव आढाव यांनी उच्च न्यायालयात त्या विरोधात याचिका क्रं.१५०/२०१८ अन्वये दाद मागितली आहे.तो दावा प्रलंबित आहे.या खेरीज धारणगाव रोड लगतच्या या खोका शॉपला त्या परिसरातील काही तरुणानीं लेखी निवेदन देऊन हरकत घेतली आहे.मात्र तुळजाभवानी शॉपिंग सेंटर ठिकाणी आपण ८० गाळे बांधु शकतो ज्या ठिकाणी कोणाची हरकत नाही त्या ठिकाणी आपण गाळे बांधण्यास आपण तयार असल्याचे सांगितले आहे.

नगरपरिषदेच्या लेख्याप्रमाणे एकूण ६१५ विस्थापित आहे.यातील प्रत्यक्षात अनेकांचे दुकाने सुरू आहे.मात्र ज्यांची आर्थिक कुवत नाही असे खरे गरजू विस्थापित दुकानदार केवळ ४५० च्या आसपास आहे.ज्यांची सोय झाली आहे अथवा ज्यांची आर्थिक क्षमता आहे त्यानी आपली नावे काढून घेतली तर बरे होईल असे आवाहन वहाडणे यांनी केले आहे.ज्यांनी बाजार पेठेत स्वभांडवल गुंतवले आहे त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी प्रारंभी घ्यावी लागेल असे आवाहन त्यांनी केले आहे.नवीन खोका शॉप करताना रोज शहरात साठ ते सत्तर हजार नागरिकांचे दळणवळण सुरु असते याचे भान ठेवले पाहिजे.या खेरीज आपण जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ज्या ठिकाणी गाळे वा खोका शॉप उभारण्यास विरोध केला त्या ठिकाणी हे काम करण्याच्या प्रयत्नांत असल्याचे सांगितले आहे.मात्र त्याची कुठलीही हमी देता येणार नाही असेही अध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close