गुन्हे विषयक
मुलासह महिला गायब,कोपरगाव पोलिसांत नोंद
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील आपली सून सुवर्णा योगेश आगवन (वय-२६) व नातू आयुश योगेश आगवन (वय-३) आदी दोघे घास कापून आणते म्हणून घरून गेली असता ती त्या ठिकाणी मिळून आली नाही.या बाबत नातेवाईक व जवळचे आप्तेष्ट यांचेकडे मिळून न आल्याने त्यांच्या बाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात हरवले बाबत दप्तरात गायब महिलेचे सासरे ज्ञानदेव भागवत आगवन (वय-६०) यांनी नोंद केली असल्याची माहिती तालुका पोलिसानी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे करंजी परिसरात खळबळ उडाली आहे.
त्यांनी आज दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की,आपली वरील नावाची सून व नातू हे काल दुपारी चार वाजेच्या सुमारास आपल्याला घास कापून आणतो म्हणून सांगून गेले होते.मात्र त्यांचा शोध घेऊनही ते मिळून आले नाही.त्या ठिकाणी घास कापून ठेवलेला दिसून आला आहे.मात्र महिला व मुलगा मात्र बेपत्ता असल्याचे सांगितले आहे.या महिलेचा रंग सावळा नाक सरळ,अंगात सहा वारी नारंगी साडी व त्याच रंगाचा ब्लॉउज आहे.तर मुलाच्या अंगात लाल रंगाचा टी शर्ट,काळ्या रंगाची विजार आहे.पायात सॅंडल आहे. अशी माहिती कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली आहे.