कोपरगाव तालुका
…या विद्यालयात संविधान दिन साजरा
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात राष्ट्रीय संविधान दिन उत्साहाने संपन्न संविधान हा भारतीय सार्वभौम तत्वाचा मुळ पाया आहे व त्यामुळे प्रत्येक नागरीकांना हक्क व कर्तव्याची जाणीव झाली.आर.बी.गायकवाड कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत २६ नोव्हेंबर राष्ट्रीय संविधान दिन उत्साहाने संपन्न झाला आहे.
भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला.संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो.२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्सामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.कोपरगाव येथील श्री गोकुळचंदजी विद्यालयातही संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
यावेळी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी राष्ट्रीय संविधान दिनाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या आहे.या कार्यक्रमाला गायकवाड आर.बी.तुपसैंदर डी.व्ही,लकारे आर.आर.कुळधरण बी.बी.सौ.पुरी एस.व्ही.बोरावके आर.आर,आदि शिक्षक सुरक्षित अंतर पाळुन उपस्थित होते.
या प्रसंगी विदयालयाचे जेष्ठ शिक्षक गायकवाड आर.बी.यांनी संविधान विषयी माहीती दीली.संविधान हा भारतिय सार्वभौम तत्वाचा मुळ पाया आहे.व त्यामुळे प्रत्येक नागरीकांना हक्क व कर्तव्याची जाणीव झाली.असे विचार त्यांनी व्यक्त केले.यावेळी संविधान दिना निमित्तानं त्यांचे वाचन करण्यात आले आहे.
या प्रसंगी श्री.गो.विदयालयात भारतरत्न डाॕ.आंबेडकर व संविधान प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले.विदयालयाचे जेष्ठ शिक्षक रवि पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन एस.डी.गोरे तर आभार ई.एल जाधव यांनी मानले आहे.