जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शिवसेनेनेही आता ढाळले विस्थापितांसाठी अश्रू !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील विस्थापितांना खोक़ा शॉप बांधुन देण्यासाठी भाजप,राष्ट्रवादी पाठोपाठ आता शिवसेनेने त्यांच्याच मागणीची रि ओढली असून कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना आज भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले असून टपरीधारकांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.मात्र कोणामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला याबाबत मात्र मौन पाळले आहे त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

“नऊ वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित राहतोच कसा ? कोपरगावातील लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालावे व हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा.जे कोणी या कामात अडथळा निर्माण करतील त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ”-कलविंदरसिंह दडियाल,अध्यक्ष कोपरगाव शहर शिवसेना.

सन-२०११ साली अनेक छोट्या व्यापाऱ्यांचे व टपरी धारकांचे अतिक्रमण जिल्हाधिकऱ्यानी काढण्यात आले होते त्यामुळेसुमारे दोन हजाराहून अधिक दुकानदारांच्या आर्थिक नुकसान झाले व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.दर निवडणुकीत अनेक पक्षांना व तात्यांच्या नेत्याना या प्रश्नांची उबळ आल्यावाचून राहात नाही.आता अवघ्या वर्षभरावर कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकायेऊन ठेपल्या असताना या टपरीधारकांच्या जखमेवरची खपली सत्ताधारी भाजपने उचकटून काढली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा हि नऊ वर्षांपूर्वी झालेली जखम भळभळली आहे.त्यामुळे गत नऊ वर्षांपासून हा प्रश्न असाच केवळ निवडणूक पाहून तोंडी लावण्याचे पातक सुरु आहे.आता या रांगेत शिवसेनेलाही आपणही मागे राहू अन्य असा मोह झालेला दिसत आहे.

त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,”कोपरगाव नगरपालिकेला वारंवार या बाबत निवेदने देण्यात आले तसेच अनेक आश्वासने मिळाली परंतु प्रत्यक्ष कारवाई झालीच नाही असा दावा केला आहे.

या वेळी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,विधानसभा संघटक अस्लम शेख,वाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,नगरसेविका वर्षा शिंगाडे,उपशहरप्रमुख विकास शर्मा,प्रफुल्ल शिंगाडे,भूषण पाटणकर,गगन हाडा,गोपाळ वैरागळ,आकाश कानडे,युवानेते विक्रांत झावरे,संघटक नितीन राऊत,बाळासाहेब साळुंके,व्यापारी सेनेचे योगेश मोरे,वाहतूक सेनेचे तालुकाप्रमुख पप्पू पेकले,उपतालुकाप्रमुख अविनाश धोक्रट,ग्राहक संरक्षण कक्षाचे राहुल देशपांडे,सतीश शिंगाणे,पप्पू देशमुख,विशाल झावरे प्रमोद बोथरा आदी मान्यवर उपस्थित होते.

एस.टी.कामगार सेनेचे शहरप्रमुख भरत मोरे म्हणाले की,”माजी नगराध्यक्ष एैश्वर्या सातभाई नगराध्यक्ष असतांना ठराव मांडण्यात आला तो मंजूर ही झाला,जागाही नमुद केल्या होत्या मग माशी शिंगते कुठे ? सर्व राजकारण्यांनी एकत्र येऊन टपरी धारकांचा प्रश्न मार्गी लावावा म्हणजे कोपरगावची बाजार पेठ विकसित होईल.पुन्हा सर्वनुमते ठराव मंजूर करून खोका शॉप बांधण्याचा निर्णय घ्यावा.गरजूंना न्याय देण्यासाठी शिवसेना कायमच त्यांच्या पाठीशी उभी राहिल.टपरी धारकांच्या प्रश्नासाठी आज निवेदन दिले आहे.उदया रस्त्यावर उतरुन आंदोलन करु असा इशारा देण्यात आला आहे.मात्र कोणामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला व आपण त्या वेळी व नंतर कोणाबरोबर होतो याबाबत सोयीस्कर मौन पाळले आहे हे विशेष !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close