जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

तळेगाव दिघे मार्गे संगमनेर रस्ता दुरुस्तीचे काम सुरु

जाहिरात-9423439946
जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

उत्तर भारतीय अवजड व प्रवासी वाहनांना पुणे महानगरीसाठी सर्वात जवळचा ठरणारा तळेगाव दिघे मार्गे कोपरगाव-संगमनेर या मार्गाची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरु केली असून हा मार्ग पुन्हा एक महिन्यात पूर्ववत होईल व त्यावर पुन्हा एक डांबरीकरणाचा थर देण्यात येणार असल्याची माहिती या उपविभागाचे सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे नागरिक व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

तळेगाव दिघे मार्गे संगमनेर या मार्गाचे काम आपला विभाग पावसाने अडथळा आणला नाही तर एक महिन्यात पूर्ण करणार आहे.त्याचे खड्डे बुजविण्याचे काम पोहेगावंच्या पुढील भागात प्रगतीपथावर ठेवणार आहे.-प्रशांत वाकचौरे,सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम,उपविभाग कोपरगाव

उत्तर भारतीय वाहनांना पुणे,कोल्हापूर,सांगली,सातारा आदी शहरांसाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणून पुणतांबा फाट्यावरून पुढे झगडे फाटा,पोहेगाव,जवळके तळेगाव दिघे,वडगाव पान मार्गे संगमनेर व पुढे आळे फाटा व नारायणगाव आदी शहरावरून हा मार्ग पुढे पुण्याला जाण्यास सर्वात जवळचा ठरतो.संगमनेर येथे तो राष्ट्रीय महामार्गाला लागतो.या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु असते.शिवाय पुण्याहून शिर्डीला येण्यासाठी हा मार्ग सर्वात जवळचा आहे.त्यामुळे प्रवासी व अवजड वाहतुकीचा या मार्गावरून कायम राबता असतो.व अवजड वाहने हि चाळीस ते पन्नास टनापेक्षा जास्त बोजा घेऊन या मार्गाने वाहतूक करतात.त्या प्रमाणात मात्र या रस्त्याची मजबुती केलेली दिसत नाही.या मार्गासाठी झगडे फाटा ते वडगाव पान या साठी जवळपास साठ कोटी रुपयांची मोठी तरतूद झाल्याची घोषणा झाली आहे.मात्र अद्याप त्याचे काम सुरु झालेले नाही.मात्र तूर्त तरी या मार्गावरील खड्डे तातडीने बुजवणे गरजेचे आहे.त्या साठी अड्.योगेश खालकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता यांना नुकतेच निवेदन देऊन या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.व आठ दिवसात काम सुरु न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.या पार्श्वभूमीवर हि प्रतिक्रिया महत्वाची समजली जात आहे.हे काम आपला विभाग पावसाने अडथळा आणला नाही तर एक महिन्यात पूर्ण करणार आहे.त्याचे खड्डे बुजविण्याचे काम पोहेगावंचे पुढील भागात प्रगतीपथावर असल्याची माहितीही प्रशांत वाकचौरे यांनी शेवटी दिली आहे.या अड्.योगेश खालकर यांचेसह या मार्गावरील व नजीकचे अवजड वाहतूकदार,प्रवासी,ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close