गुन्हे विषयक
तरुणांचे निधन,पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील तरुण जयवंत विष्णूपंत जाधव (वय-३५) या तरुणांचे अकस्मात निधन झाले असून त्याच्यावर उपचार करण्यासाठी नजीकच्या नागरिकांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकांऱ्यानी त्यास मृत घोषित केले आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सदर तरुणांची हि घटना दि.मंगळवार दि.२७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.१० वाजे पूर्वी घडली आहे.यातील मयतास नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता हि घोषणा केली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी अकस्मात मृत्यू नोंदणी पुस्तक क्रं.५३-२०२० सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.