कोपरगाव तालुका
लेखकाने लिहिते राहिले तर वाचण्यास आनंद
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संवेदनशील मनाचा माणूस जेंव्हा लिहिता होतो व अनुभवाला शब्दबद्ध करतो तेंव्हा कथा कादंबरी जन्माला येते असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता मालकर यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येत आहे.त्यासाठी प्रत्येक शाळा-महाविद्यालयात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत व नवीन पिढीस वाचन संस्कृती वाढविण्यास प्रोत्साहन देण्यास बजावले आहे.
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येत आहे.त्यासाठी प्रत्येक शाळा-महाविद्यालयात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.विद्यार्थ्यांना वाचनाचा छंद लागावा,या साठी विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.तद्वतच डॉ.कलाम यांच्या किमान एका पुस्तकाचे वाचन नागिरकांनी करावे,असेही यात अभिप्रेत आहे.या वाचन दिनाचे औचित्य साधून कोपरगाव शहरात सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठाणच्या वतीने “वाचन दिन” साजरा करण्यात आला आहे.त्यावेळी त्या बोलत होत्या.
सदर प्रसंगी जेष्ठ लेखक व राजश्री शाहू महाराज जेष्ठ नागरिक सेवा मंचचे अध्यक्ष मंसाराम पाटील,वृत्तपत्र छायाकार हेमचंद्र भवर,नवनाथ सूर्यवंशी,सुनीता इंगळे,डॉ.दादासाहेब गलांडे,आदी मान्यवरांचा या वेळेला शाल,श्रीफळ भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला आहे.
त्यावेळी उपस्थितांचे आभार अरविंद मालकर यांनी मानले आहे.