निधन वार्ता
शेती मडळाचे माजी संचालक वहाडणे कालवश
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील रहिवाशी व भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी खा.स्व.सूर्यभान पाटील वहाडणे यांचे कनिष्ठ बंधू अर्जुनराव वहाडणे (वय-८२) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,तीन मुले,एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.अर्जुनराव वहाडणे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायम सरकारशी संघर्ष करत.गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या हितासाठी त्यांनी कायम संचालक मंडळाशी संघर्ष केला आहे.त्यांच्यावर पुणतांबा येथे गोदावरी तिरी शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले आहे.ते कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांचे चुलते तर प्रताप वहाडणे यांचे वडील होते.