जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

रविवारी कोपरगाव राहणार खुले-नगराध्यक्ष वहाडणे

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरंगाव शहर येत्या रविवार दि.११ ऑक्टोबर रोजी व्यापारी महासंघाने आपल्याशी व प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वाहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.त्यामुळे रविवारी टाळेबंदी उठविल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

ग्रामीण भागात रुग्ण वाढताना दिसत असले तरी “माझे कुटुंब,माझी जबाबदारी”या योजनेअंतर्गत तालुक्यात घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका व आशा सेविका या तपासण्या करत असल्याने हि मोहीम छुपे रुग्ण शोधत असल्याने हि संख्या वाढत आहे.काही काळाने शहरातील रुग्णांप्रमाणेच त्यात उतार येण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता रविवारच्या टाळेबंदीची गरज उरली नसल्याचे अनेक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.या टाळेबंदी उठविण्याच्या निर्णयाला पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी दुजोरा दिला आहे.

कोपरगाव व्यापारी महासंघाने वारंवार मागणी केल्याने व कोरोना साथीच्या नियंत्रणाला तालुका प्रशासनाला चांगले यश मिळाल्याने व्यापारी महासंघाने येत्या रविवारी कोपरगाव शहरात असलेली ताळेबंदीचा निर्णय मागे घ्यावा या मागणीला नगरपरिषद यंत्रणेने मंजुरी दिल्याची माहिती व्यापारी महासंघाचे सचिव सुधीर डागा यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली होती.त्या नंतर काहींनी असामाजिक तत्त्वांनी जनतेत संभ्रम पसरविणाऱ्या बातम्या प्रसिद्ध करून जनतेत संभ्रम तयार केला होता.त्या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने या बाबत नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वाहडणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यास दुजोरा दिला आहे.व आपण या बाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून त्यांनी या बाबत निर्णय व्यापारी महासंघ व नागरिकांनी घ्यावयाचा आहे असे सांगितले असल्याची माहिती दिली आहे.जनता टाळेबंदीचा निर्णय हा प्रशासनाचा नव्हता तर जनतेचा स्वयंस्फूर्तीचा असल्याने त्या बाबत निर्णय घ्यायला ते स्वतंत्र असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.कोपरगाव शहरात पहिली टाळेबंदी बावीस मार्च रोजी जनतेने स्वयंस्फूर्तीने जाहीर केली होती.त्या नंतर २४ मार्च रोजी सरकारने अधिकृतरित्या ती जाहीर केली होती.कोपरगावात पहिल्यांदा १० एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण गांधीनगर येथे आढळला होता.त्यानंतर सलग कोरोना रुग्णांची वाढ होत राहिली.मात्र गत सप्ताहापासून मात्र त्यात लक्षणीय रित्या उतार आला आहे.ग्रामीण भागात रुग्ण वाढताना दिसत असले तरी “माझे कुटुंब,माझी जबाबदारी”या योजनेअंतर्गत तालुक्यात घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका व आशा सेविका या तपासण्या करत असल्याने हि मोहीम छुपे रुग्ण शोधत असल्याने हि संख्या वाढत आहे.काही काळाने शहरातील रुग्णांप्रमाणेच त्यात उतार येण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता रविवारच्या टाळेबंदीची गरज उरली नसल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे.त्यांनी अनेक दिवसापासून हि बंदी उठवावी अशी मागणी सुरू ठेवली होती.त्यावेळी त्यांनी प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचा दावा केला आहे.त्याबाबत बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत.तर दुसरा एक गट पडद्याआडून त्यात आपली प्रतिष्ठा पणाला लावून व्यापारी महासंघाला तोंडघशी पाडण्याच्या प्रयत्नांत आहे असे दिसते.त्यातून काहींनी शहरात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.तसेही शहरात रविवारी बऱ्याच दुकानदारांचा कल सुट्टी घेण्याचा असतो तर काहींच्या म्हणण्यानुसार रविवारी चाकर मान्यांना सुट्टी असल्याने तो दिवस त्यांना आपल्या दुचाक्या,चार चाकी वाहनांची कामे,शॉपिंग करताना अडचणी येतात.त्यामुळे रविवार त्यांच्या साठी बाजारात जाण्यासाठी सोयीचा असल्याने त्यांची मागणी रविवारी टाळेबंदी उठविण्याकडे आहे.व सर्व व्यापाऱ्यांशी चर्चा करूनच आपण निर्णय घेतल्याचा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कोयटे यांचा दावा आहे.तर त्याला आता नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनीही दुजोरा दिल्याने आता टाळेबंदी उठविण्याच्या निर्णयाची बाजू सुर्यप्रकाशाइतकी स्वच्छ झाल्याचे मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close