जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

ब्राम्हणगाव नजीक दुचाकीस धडक,इसम ठार

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील टाकळी ते ब्राम्हणगाव या मार्गावर आपल्या दुचाकीवरून (क्रं.एम.एच.१५ बी.पी.६८९३) दुचाकीस्वार भीमा येसु खुरसने (वय-५५) ब्राम्हणगाव कडून टाकळीकडे जात असताना पाठीमागून येणारा टाटा कंपनीचा छोटा हत्ती टेम्पोने त्यांना जोराची धडक दिल्याने या अपघातात ते ठार झाल्याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्यादी मंगेश वाळीराम जिरे (वय-४०) रा.देवी वस्ती धारणगाव यांनी अज्ञात चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.हि घटना शुक्रवार दि.११ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या पूर्वी महाजन वस्ती जवळ घडली आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव ते रवंदे या मार्गावरून मयत भीमा खुरसने हे आपल्या वरील क्रमांकाच्या दुचाकीवरून ब्राम्हणगाव कडून टाकळी कडे जात असताना छोटा हत्ती या टेम्पोने त्यांना मागील बाजूने जोराची धडक दिली त्यात गंभीर जखमी झाले होते.घटनेनंतर टेम्पो चालक याने जखमीला तसेच सोडून तो पसार झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव ते रवंदे या मार्गावरून मयत भीमा खुरसने हे आपल्या वरील क्रमांकाच्या दुचाकीवरून ब्राम्हणगाव कडून टाकळी कडे जात असताना छोटा हत्ती या टेम्पोने त्यांना मागील बाजूने जोराची धडक दिली त्यात गंभीर जखमी झाले होते.घटनेनंतर टेम्पो चालक याने जखमीला तसेच सोडून तो पसार झाला आहे.त्यांना नजीकच्या ग्रामस्थांनी दवाखान्यात उपचारार्थ भरती केले असताना उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.नं.भा.द.वि.कलम ३०४,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४,(अ),(ब) १७७ द्वारे अज्ञात टेम्पो चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एम.ए.आंधळे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close