जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात सहा बेशिस्त नागरिकांवर गुन्हे दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात कोरोना विषाणूची साथ अजूनही मोठ्या प्रमाणात वाढत असून दोन दिवसात तीन जणांचा तर आजअखेर तेवीस जणांचा मृत्यू झाल्याने आता परिणामस्वरूप कोपरगाव शहर पोलिसानी आता आणखी कडक कारवाईची भूमिका घेतली असून आज सकाळ पासून केलेल्या कारवाईत सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामुळे बेशिस्त नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोपरगाव तालुक्यात आतापर्यंत २३ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.त्यामुळे कोरोना साथी बाबत नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरिकांचा मुखपट्याविना असाच सर्वथैव संचार राहिल्यास कोरोना वाढत जाणार हे उघड आहे.त्यामुळे मुखपट्या न बांधणाऱ्या नागरिकांचा बंदोबत करणे पोलिसांना गरजेचे बनले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता कडक धोरण अवलंबले आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या साथीने कहर केला असून दोन वाजण्याच्या सुमारास आलेल्या अहवालात केलेल्या अँटीजन रॅपिड टेस्ट बाधित रुग्णांची संख्या १४ झाली आहे त्यात कोपरगाव शहरातील ०८ बाधित निघाले तर ग्रामीण भागातील ०६ जण बाधित असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान आता कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १ हजार २०० इतकी झाली आहे.त्यात १०२ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत २३ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.त्यामुळे कोरोना साथी बाबत नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरिकांचा मुखपट्याविना असाच सर्वथैव संचार राहिल्यास कोरोना वाढत जाणार हे उघड आहे.त्यामुळे मुखपट्या न बांधणाऱ्या नागरिकांचा बंदोबत करणे पोलिसांना गरजेचे बनले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता कडक धोरण अवलंबले आहे.त्यातून हि कारवाई आज दुपारी बारा ते दोन वाजेच्या दरम्यान केलेल्या कारवाईत शहरातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत त्यात आरोपी अभिजित भाऊसाहेब दिघे (वय-२२) रा.कोल्हेवाडी ता.संगमनेर,विजय शिवाशिंग परदेशी (वय-१८) रा.रेल्वे स्थानकासमोर शिंगणापूर कोपरगाव,सलमान इसाक पठाण (वय-२२) रा.भैरवनाथवाडी,टाकळी,दिनेश रमेश वढणे (वय-२७) रा.मुर्शतपुर,अस्लम नाजीम शेख (वय-२१),वडांगळे वस्ती,तुषार शिवाजी वढणे (वय-३२) रा.मुर्शतपुर फाटा ता.कोपरगाव आदीं सहा जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.त्यात कोरोना विषाणूची साथ चालू असतानाही तोंडाला मुखपट्या न बांधणे,चालू गादीवर फोनवर बोलणे,शासनाने व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश न पाळणे आदी कारणाने गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी फिर्यादी पोलिस अधिकाऱ्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७०,२९०,कलम २८३ प्रमाणे मोटार वाहन कायदा कलम-१५८,१३०,/१७७,५०,५१/१७७ प्रमाणे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ससाणे,पो.हे.कॉ.एस.एच.गायमुखे,आर.पी.पुंड,डी.आर.तिकोणे,श्री खारतोडे,श्री दारकुंडे आदी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close