जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोळपेवाडीत एकाचा खून,दोघांवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील रहिवाशी मात्र तीन वर्षांपूर्वी वडांगळी ता.सिन्नर येथे राहाण्यास गेलेले इसम पुंजा भागाजी नरोटे (वय-६०) यांचा कोळपेवाडी येथील आरोपी दत्तात्रय किसन कोळपे (वय-४५) व श्रावण कोंडाजी हलवर (वय-४४) या दोघांनी अज्ञात कारणासाठी लाठी-काठी व लाथाबुक्यांनी जबर मारहाण करून त्यानां गंभीर जखमी केले असून त्यानां उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले असता त्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याची फिर्याद मयताचा मुलगा सोमनाथ पुंजाजी नरोटे (वय-३१) यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान या बाबत कोपरगाव तालुका पोलिसानी आरोपी दत्तात्रय कोळपे व श्रावण हलवर यांना अटक केली असून त्याना कोपरगाव न्यायालयापुढे हजर केले असता त्याना न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे एकूण आरोपीना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.या बाबत आमच्या प्रतिनिधीने कानोसा घेतला असता या घटनेला अनैतिक कारण असल्याची नागरिकांत छुपी चर्चा सुरु असल्याचे दिसून आले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत पुंजा नरोटे हे पूर्वी कोळपेवाडी येथे आपली जमीन घेऊन राहत होते.मात्र त्यांनी काही काळाने हि जमीन विकून सिन्नर तालुक्यातील वडांगळी या ग्रामपंचात हद्दीत सन-२०१७ साली घेतली व ते आपल्या कुटुंबियासंवेत त्या ठिकाणी राहण्यास गेले होते.मात्र त्यांचे कोळपेवाडी या ठिकाणी त्यांचे रेशन कार्ड असल्याने या ठिकाणी कायम येणे-जाणे होते.ते २८ ऑगष्ट रोजी त्यांचा मुलगा घरी असताना आपल्या बजाज प्लॅटिना दुचाकी वरून कोळपेवाडी येथून,”मी, रेशन घेऊन येतो” असे सांगून गेले होते.त्या दिवशी आपण त्यांच्याशी भ्रमणध्वनिवरून संपर्क साधून त्याना विचारणा केली असता त्यांनी,”आपण गावात असल्याचे” सांगितले होते.मात्र ते त्या दिवशी घरी न आल्याने आपण त्यांचा शोध घेण्यासाठी कोळपेवाडी या ठिकाणी आलो मात्र ते मिळून आले नाही.रात्री उशीर झाल्याने त्यांचा मुलगा फिर्यादी हे घरी निघून गेले.परंतु त्यांनी पुन्हा त्यांच्या भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधला असता त्यांनी तो उचलला नाही.दुसऱ्या दिवशी फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा शोध घेतला असता त्यांना त्यांचे आतेभाऊ तुषार सरोदे यांनी ते जिल्हा परिषद शाळेजवळ जमिनीवर पडलेले असल्याची माहिती दिली असता फिर्यादी हे घटनास्थळी गेले असता त्याना फिर्यादीचे वडील जखमी अवस्थेत मिळून आले.त्यांना मारहाण झालेली दिसून आली.त्यांचा चेहरा व डावा डोळा सुजलेला दिसून आला आहे.व कानाजवळ मार लागलेला दिसून आला होता.त्यांना फिर्यादी मुलाने उठवून बसवल्यावर त्यांना मारहाणीबाबत विचारणा केली असता त्यांनी,”आपल्याला दत्तात्रय किसन कोळपे व श्रावण कोंडाजी हलवर या दोघांनी २८ ऑगष्ट रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास काठीने व लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले”असल्याने सांगितले आहे.त्यानंतर त्याना कोपरगाव ग्रामीण रुग्णालय व त्या नंतर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारार्थ भरती केले असता त्यांचे ३० ऑगष्ट रोजी सायंकाळी निधन झाले आहे.या प्रकरणी मयताचे मुलाने या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु,र.क्रं.४२०/२०२० भा.द.वि.कलम ३०२,३४ प्रमाणे वरील दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे व पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी भेट दिली आहे.पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस पोलीस करीत आहेत.

दरम्यान या बाबत कोपरगाव तालुका पोलिसानी आरोपी दत्तात्रय कोळपे व श्रावण हलवर यांना अटक केली असून त्याना कोपरगाव न्यायालयापुढे हजर केले असता त्याना न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे एकूण आरोपीना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.या बाबत आमच्या प्रतिनिधीने कानोसा घेतला असता या घटनेला अनैतिक कारण असल्याची नागरिकांत छुपी चर्चा सुरु असल्याचे दिसून आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close