कोपरगाव तालुका
कोपरगाव मंडलात सर्वाधिक पावसाची नोंद
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात या वर्षी पावसाळा सात जून ऐवजी तीन जून पासूनच सुरु झाला असून आज अखेर पंधरा दिवसात कोपरगाव तालुक्यातील दहीगाव बोलका महसूल मंडलात सर्वाधिक २३८ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे.या खेरीज कोपरगाव मंडलात २१२ मी.मी.तर त्या खालोखाल पोहेगाव मंडलात १७७ मी.मी.तर सुरेगाव मंडलात ११० तर रवंदे मंडळात सर्वाधिक नीचांकी १०९ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे.त्यामुळे तालुक्यात खरीप पिकांच्या पेरणीस गती मिळाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
दि.१२ जून पासून तर १५ जूनचा अपवाद वगळता अठरा जून पर्यंत सलग पावसाने हजेरी लावली आहे.तरी रवंदे मंडलात पाऊस सर्वाधिक कमी नोंदवला गेला आहे.तसेच आज दुपारी चार वाजेच्या सुमारास पोहेगावच्या वरील दुष्काळी पट्ट्यात आज पावसाने जोरदार सलामी दिली आहे.त्यामुळे या भागात आता पेरण्यांना वेग येणार आहे.तरीही या परिसरात काही शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई केलेली आढळून आली आहे.
पावसाचे असे निश्चित असे काही वेळापत्रक नाही भारतातील पाऊस लहरी म्हणून गणला जातो तसा अनुभव या वर्षी सुरुवातीलाच आला असून सरासरी पाऊस सात जून रोजी सुरु होतो.मात्र या वर्षी त्याने चार दिवस आधीच हजेरी लावून आपल्या लहरीपणाची चुणूक दाखवली आहे.या खेरीज पावसाने दहिगाव बोलका परिसरात सोळा जून रोजी कहर केला आहे.अनेक शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे.घरादारात पाणी गेलेले आढळले आहे.पेरणी झालेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.या परिसरात एका वेळी या परिसरात ७२ मी.मी.पावसाची नोंद केली गेली आहे.दि.४ जून रोजी कोपरगाव शहर परिसरात पावसाने ४९ तर पोहेगावात ४५,सुरेंगावात ४३ रवंदेत ४२ दहिगाव बोलका परिसरात ३२ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे.
दि.१२ जून पासून तर १५ जूनचा अपवाद वगळता अठरा जून पर्यंत सलग पावसाने हजेरी लावली आहे.तरी रवंदे मंडलात पाऊस सर्वाधिक कमी नोंदवला गेला आहे.तसेच आज दुपारी चार वाजेच्या सुमारास पोहेगावच्या वरील दुष्काळी पट्ट्यात आज पावसाने जोरदार सलामी दिली आहे.त्यामुळे या भागात आता पेरण्यांना वेग येणार आहे.तरीही या परिसरात काही शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई केलेली आढळून आली आहे.या खेरीज तालुका कृषी विभागाने या वर्षी घरच्या बियाणे पेरणीस प्रोत्साहन दिल्याने व अठरा उंचावर सोयाबीनची पेरणी करावी हि जनजागृती फळास येईल असा आशावाद कृषी विभागास निर्माण झाला आहे.तर काही शेतकऱ्यांनी यंदा पाऊस वेळेवर होऊनही पेरणीस जास्त घाई केलेली आढळून आली आहे.त्यांच्या खरीप पेरणीस दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते असा संशय कृषी विभागाने व्यक्त केला आहे.तो जास्त संयुक्तिक वाटत आहे.अद्याप सुरेगाव,रवंदे मंडलात अद्याप पुरेसा पाऊस उपलब्ध नाही हा चिंतेचा विषय आहे.मात्र यंदा हवामान खात्याने जास्त पाऊस सांगितल्याने हि भर निघण्याची शक्यता आहे.