जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोकमठाणात तरुणीची आत्महत्या,अकस्मात मृत्यूची नोंद

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या व के.जे.सोमय्या महाविद्यालयात बारावीची (कला) नुकतीच परीक्षा दिलेली महाविद्यालयीन तरुणी कु.ज्योती विजय काळे (वय-१८)हिने राहत्या घरात शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास साडीच्या साहाय्याने अज्ञात कारणाने आत्महत्या केली आहे.त्यामुळे कोकमठाण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शुक्रवार दि.१९ जून रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मयत तरुणीचे वडील पुढे आपल्या घराला आतील बाजूस रंग देत होते.तर आई नदीवर धुणे धुण्यासाठी गेली होती.तर एक बहीण आपल्या वडिलांना रंगकाम करताना मदत करत असताना हि तरुणी मागील बाजूस असलेल्या स्नानगृहात स्नानासाठीच्या बहाण्याने मागे गेली व जाताना दरवाजाची कडी लावून घेतली.बराच वेळ झाला तरी ती बाहेर का येत नाही व काही हालचाल हि दिसत नाही म्हणून घरातील इतर नातेवाईकांना संशय आला असता त्यांनी दरवाजाची कडी तोडून मागे जाऊन पहिले असता त्यांना झालेला प्रकार लक्षात आला.

चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत नुकतीच एका महिलेने आत्महत्या केली असताना त्या पाठोपाठ कोकमठाण हद्दीत कोकमठाण रस्त्यालगत रहिवाशी असलेल्या कुटुंबात दोन मुली व आई वडील असे कुटुंब राहात आहे.मात्र शुक्रवार दि.१९ जून रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मयत तरुणीचे वडील पुढे आपल्या घराला आतील बाजूस रंग देत होते.तर आई नदीवर धुणे धुण्यासाठी गेली होती.तर एक बहीण आपल्या वडिलांना रंगकाम करताना मदत करत असताना हि तरुणी मागील बाजूस असलेल्या स्नानगृहात स्नानासाठीच्या बहाण्याने मागे गेली व जाताना दरवाजाची कडी लावून घेतली.बराच वेळ झाला तरी ती बाहेर का येत नाही व काही हालचाल हि दिसत नाही म्हणून घरातील इतर नातेवाईकांना संशय आला असता त्यांनी दरवाजाची कडी तोडून मागे जाऊन पहिले असता त्यांना झालेला प्रकार लक्षात आला.तिने आपल्या घराच्या छतास साडी लावून गळफास घेतलेला दिसून आला त्यांनी तातडीने तिला खाली उतरून पुढील उपचारासाठी दवाखान्यात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यानी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले आहे.

घटनास्थळी शिर्डी उपवीभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे,पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी भेट दिली असून या संबंधी शहर पोलीस ठाण्याच्या दप्तरात अकस्मात मृत्यू र.क्रं.२२/२०२० सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. व्ही. गवसने हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close