जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

डाउच खुर्द शिवारात बिबट्याचा हल्ला,चार शेळ्या ठार

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

धारणगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील डाऊच खु॥परीसरात असलेल्या गुरसळवाडी येथील अर्जुन होन यांच्या वस्तीवर बिंबट्याने हल्ला करून चार शेळ्या ठार केल्याची माहीती डाउच गावचे सरपंच संजय गुरगळ यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

मागील आठवड्यात घटनास्थळा पासुन १ ते २ किलोमीटर अंतरावर असलेल्या जेउर-कुंभारीपरीसरात बिबट्याने दर्शन दिले होते. यावेळी वनाअधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु वनविभागाने कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे सदर परीसरात हि घटना घडली असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे.

या बाबतचे सविस्तर वृत्त असे कि डाउच खु॥ ग्रामपंचायत हद्दीतील गुरसळवाडी येथील अर्जुन गणपत होन यांच्या वस्तीवर गुरूवार दि.११ रोजी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान होन यांचे कुटुंब साखरझोपेत असताना हि घटना घडल्याचे समजते. पहाटे अर्जुन होन यांना आपल्या गोठ्याची संरक्षक जाळी तुटली असल्याचे निर्देशनास आले त्यांनी जवळ जाऊन बघितले असता गोवठ्यातील त्याच्या मालकीच्या अंदाजे ४० हजार रूपये किमतीच्या ४ शेळ्यांचा पायांचे व मानेचे लचके तोडल्याचे निर्देशनास आले त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला असता परीसरातील नागरीक घटनास्थळी जमा झाले व सर्वानी मिळुन सदर परीसराची पहाणी केली असता एक प्रौढ बिबट्या व दोन बछड्यांच्या पायाचे ठसे आढळुन आले या वरून शेळ्या बिबट्याचा हल्ल्यात ठार झाल्याचे पक्के झाले आहे. सदर घटनेने परीसरात भितिचे वातावरण पसरले आहे.या घटनेची माहीती मिळताच डाउच खु॥चे सरपंच संजय गुरसळ यांनी घटनास्थळी भेट देत विचारपुस करून दिलासा दिला आहे.
मागील आठवड्यात घटनास्थळा पासुन १ ते २ किलोमीटर अंतरावर असलेल्या जेउर-कुंभारीपरीसरात बिबट्याने दर्शन दिले होते. यावेळी वनाअधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु वनविभागाने कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे सदर परीसरात हि घटना घडली असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. तरी सदर घटनेची दखल घेउन वन विभागाने या श्वापदाचा बंदोबस्त करावा व सदर शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नागरीकांमधुन होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close