जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव नजीक ट्रक अपघात,दुचाकीस्वार जागीच ठार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाट्यानजीक काल सायंकाळी ६.३० च्या सुमारास फरसपुरा ता.धरमपुरी जिल्हा धार, मध्यप्रदेश येथील एक मालवहातूक ट्रकने (क्रं.एम.पी.०९,एच.जी.७५७९) मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारास ती ओलांडताना धडक दिल्याने ‘त्या’ अपघातात दुचाकी स्वार (क्रं.एम.एच.१५,सी.८६५९) वरील चालक हा मागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या दुचाकीस्वाराच्या दुचाकीवर ‘सम्राट केटरर्स’ असे अक्षरे लिहिलेली असल्याने हे केटरिंग’ व्यवसाय करीत असावा असा कयास व्यक्त होत असून हा इसम येवला,मनमाड भागातील असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे यांनी भेट देऊन गांभीर्याने हि घटना घेतली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की, वरील क्रमांकाच्या नाशिक जिल्ह्यातील गाडी पासिंग असलेल्या दुचाकी स्वार हा काल सायंकाळी ६.३० च्या सुमारास येवल्याकडे जात असताना मध्यप्रदेश मधील वरील क्रमांकाच्या ट्रक चालक आनंद बाबूलाल औसारी याने आपल्या ताब्यातील ट्रक हा भरधाव चालवून अविचाराने व हयगईने चालवून त्याच्या पुढे चाललेल्या दुचाकी स्वारास ओलांडताना त्या दुचाकीस्वारास धक्का दिला त्याने तो ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाला आहे.या दुर्घटनेनंतर ट्रक चालक हा अपघाताची खबर न देताच निघून गेला आहे.व दोन्ही वाहनांचे नुकसानींस कारणीभूत झाला असल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉ.प्रकाश सुरेश नवाळी यांनी दाखल केली आहे.

दरम्यान या दुचाकीस्वाराच्या दुचाकीवर ‘सम्राट केटरर्स’ असे अक्षरे लिहिलेली असल्याने हे केटरिंग’ व्यवसाय करीत असावा असा कयास व्यक्त होत असून हा इसम येवला,मनमाड भागातील असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे यांनी भेट देऊन गांभीर्याने हि घटना घेतली आहे.याबाबत काही माहिती असल्यास कोपरगाव शहर पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१७८/२०२१ भा.द.वि.३०४(अ),२७९,३३७,३३८,४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४ (अ) प्रमाणे वरील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close