जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव नजीक एक महिलेचे निधन,परिसरात घबराहट !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या लगत असलेल्या जेऊर पाटोदा ग्रामपंचायत हद्दीतील धारणगाव रस्ता येथील पंचेचाळीस वर्षीय महिलेचा नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे नुकताच संशयास्पद मृत्यू झाला आहे.तथापि तो कोरोनामुळे झालेला नसल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन यांनी केले आहे.

जेऊर-पाटोदा हद्दीतील धारणगाव रस्त्यालगत रहिवाशी असलेल्या पंचेचाळीस वर्षीय महिला आजारी असल्याने आधी त्यांना प्राथमिक तपासणीसाठी ब्राम्हणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात भरतीसाठी पाठविण्यात आले होते.त्यांनी या महिलेला कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी शिफारस केली होती तर ग्रामिण रुग्णालयाने त्यांना शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात पाठवले होते.मात्र साईबाबा रुग्णालयाने या महिलेला नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठविल्यावर त्यांचा श्राव तपासणी करण्यासाठी घेण्यात आला होता.दरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याने जेऊर पाटोदा व कोपरगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

कोपरगाव तालुक्यातील व शहरा नजीक असलेल्या जेऊर-पाटोदा हद्दीतील धारणगाव रस्त्यालगत रहिवाशी असलेल्या पंचेचाळीस वर्षीय महिला आजारी असल्याने आधी त्यांना प्राथमिक तपासणीसाठी ब्राम्हणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात भरतीसाठी पाठविण्यात आले होते.त्यांनी या महिलेला कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी शिफारस केली होती तर ग्रामिण रुग्णालयाने त्यांना शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात पाठवले होते.मात्र साईबाबा रुग्णालयाने या महिलेला नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठविल्यावर त्यांचा श्राव तपासणी करण्यासाठी घेण्यात आला होता.दरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याने जेऊर पाटोदा व कोपरगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.मात्र या महिलेच्या मृत्यू नंतर त्यांच्या तपासणीचा अहवाल आला होता.सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मात्र या संशयास्पद महिलेचा मृत्यू मात्र कोरोनामुळे नव्हे तर जुन्या क्षयरोगामुळे झाला असल्याचा खुलासा केला आहे.त्यामुळे कोपरगाव शहर व जेऊर-पाटोदा ग्रामस्थांच्या मनातील भीती नाहीशी होण्यास मदत मिळणार आहे.

दरम्यान ब्राम्हणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने टाकळी, ब्राम्हणगाव परिसरातील परिसरातील ग्रामस्थांच्या जवळपास शंभर घरांची व त्यातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली आहे.व नागरिकांना दिलासा दिला आहे.व नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close