जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

एक ऑगष्ट नंतरच शाळा सुरु कराव्या- मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणुजन्य आजाराने थैमान घातलेले असताना अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळा जून महिन्यामध्ये सुरु करणे धोकादायक ठरेल. हा धोका लक्षात घेवून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जून ऐवजी १ ऑगष्ट नंतरच शाळा सुरु कराव्यात अशी मागणी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सदस्य राजेश परजणे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

यावर्षी कोरोना विषाणुजन्य आजाराने संपूर्ण जगच हादरलेले आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळा घाई गरबडीमध्ये सुरु करणे अप्रस्तुत होईल.प्राथमिक शाळेतील लहान मुलांची आकलन क्षमता, त्यांची मानसिकता याचा विचार करता या पावसाळी वातावरणात शाळा सुरु करणे धोकादायक ठरु शकते.

त्यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की,१५ जून २०२० पासून प्राथमिकचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असते. परंतु यावर्षी कोरोना विषाणुजन्य आजाराने संपूर्ण जगच हादरलेले आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळा घाई गरबडीमध्ये सुरु करणे अप्रस्तुत होईल.प्राथमिक शाळेतील लहान मुलांची आकलन क्षमता, त्यांची मानसिकता याचा विचार करता या पावसाळी वातावरणात शाळा सुरु करणे धोकादायक ठरु शकते. पावसाळी वातावरणामध्ये लहान मुलांना सर्दी, खोकला व इतर संसर्गजन्य आजार उद्भवण्याचा धोका अधिक असतो. कोरोनासारख्या आजाराला तोंड देण्याची प्रतिकार शक्ती लहान मुलांमध्ये नसल्याने त्यांच्या जिवितास देखील धोका निर्माण होवून शकतो. त्यातच लहान मुलांना वैयक्तीक शारीरिक स्वच्छतेची समज कमी असते. शिवाय अनेक शाळांमध्ये महिला शिक्षिका नसल्याने मुलांकडे व्यवस्थित लक्ष देता येत नाही.अशा परिस्थितीमध्ये शासनाने १ ऑगष्टपर्यंत शाळा सुरु करण्याबाबतचा विचार करु नये. या दीड महिन्यातील मुलांच्या अभ्यासाचा वेळ व इतर सुट्टया रद्द करुन भविष्यात कधीही हा अनुशेष भरुन काढता येवू शकतो.


या सर्व गंभिर बाबींचा विचार होवून शाळा व्यवस्थापन समिती किंवा शिक्षक यांच्या निर्णयावर शासनाने अंतिम निर्णय करण्यापेक्षा गांवचे सरपंच,पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य,आमदार,खासदार या लोकप्रतिनिधींकडून मते अजमावून घेवून नंतरच शाळा सुरु करण्याबाबत निर्णय शासनाने घ्यावा अशीही मागणी राजेश परजणे यांनी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close