जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

राघोजी भांगरे यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची पुण्यतिथी अहमदनगर जिल्हा आदिवासी कोळी युवक संघटनेच्या वतीने नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

इ.स. १८३० साली अकोले तालुक्यातील रामा किरवा यांना पकडून अहमदनगर येथील तुरुंगात फाशी देण्यात आली. यामुळे महादेव कोळी जमातीच्या बंडखोरांत दहशत पसरेल असे ब्रिटिशांना वाटत होते.रामाचा जोड़ीदार राघोजी भांगरे यानीं सरकारविरोधी बंडात सामील होऊ नये यासाठी त्याला मोठ्या नोकरीवर घेतले परंतु नोकरीत पदोपदी होणारा अपमान आणि पगारातली काटछाट यामुळे राघोजी चिडले.नोकरी सोडून त्यानीं बंडात उडी घेतली. उत्तर पुणे जिल्ह्यात व नगर जिल्ह्यात राघोजी आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाला.

मराठा सैन्यास हरवल्यानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारांत गणल्या जाणाऱ्या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या शिलेदाऱ्या,वतनदाऱ्या काढल्या.परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. इ.स. १८२८ साली शेतसारा वाढवण्यात आला. सारावसुलीमुळे गोरगरिबांना रोख पैशाची गरज भासू लागली त्यामुळे गोरगरिब सावकार, वाण्याकडून भरमसाठ दराने कर्जे घेऊ लागले. कर्जाच्या मोबदल्यात सावकार जमिनी बळकावू लागले.त्यामुळे राघोजींनी सावकार आणि ब्रिटिश यांच्याविरुद्ध बंडाला सुरुवात केली.

इ.स. १८३० साली अकोले तालुक्यातील रामा किरवा यांना पकडून अहमदनगर येथील तुरुंगात फाशी देण्यात आली. यामुळे महादेव कोळी जमातीच्या बंडखोरांत दहशत पसरेल असे ब्रिटिशांना वाटत होते.रामाचा जोड़ीदार राघोजी भांगरे यानीं सरकारविरोधी बंडात सामील होऊ नये यासाठी त्याला मोठ्या नोकरीवर घेतले परंतु नोकरीत पदोपदी होणारा अपमान आणि पगारातली काटछाट यामुळे राघोजी चिडले.नोकरी सोडून त्यानीं बंडात उडी घेतली. उत्तर पुणे जिल्ह्यात व नगर जिल्ह्यात राघोजी आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाला.इ.स. १८३८ साली रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात त्यांनी बंड उभारले. कॅप्टन मॅकिंटॉश याने हे बंड मोडण्यासाठी सर्व अवघड खिंडी,दऱ्या,घाट,रस्ते, जंगले याची बारीकसारीक माहिती मिळविली. बंडखोरांची गुपिते बाहेर काढली.परंतु बंडखोर वरमले नाहीत.उलट बंडाने व्यापक रूप धारण केले. ब्रिटिशांनी कुमक वाढवली. मार्ग रोखून धरले. ८० लोकांना कैद केले. दहशतीमुळे काही लोक उलटले.फंदफितुरीमुळे राघोजींचा उजवा हात समजला जाणारा बापूजी मारला गेला.राघोजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने ५ हजारांचे बक्षीस जाहीर केले.पंढरपुरात अखेर राघोजींना साधूच्या वेशात अटक करण्यात आली व ठाणे कारागृहात २ मे १८४८ रोजी फाशी देण्यात आले.त्यांच्या अजोड कार्याचे आजही स्मरण केले जाते.त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

त्या वेळी आदिवासी कोळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित आगलावे,मनोहर शिंदे,गोविंद आढळ, अशोक उंडे,शरद शिंदे,आदींसह बहूसंख्य नागरिक सुरक्षित अंतर पाळून उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close